पत्नीच्या विरहात पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर : पत्नीच्या विरहात पती विजू ताराचंद सिरसाम (40) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना जुनी शुक्रवारीतील तेलीपुरा येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजू सिरसाम हे मजुरी करीत होते. विजू यांचा पत्नीसोबत सतत वाद होत होता. 15 दिवसांपूर्वी पत्नी दोनही मुलांसह माहेरी गेली. तेव्हापासून ते विरहात होते. त्यांना दारूचे व्यसन जडले. शनिवारी मध्यरात्री त्यांनी दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली.

रविवारी सायंकाळपर्यंत ते घराबाहेर निघाले नाहीत. संशय आल्याने घरमालकाने विजू यांना आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून बघितले असता विजू गळफास लावलेले दिसले. घरमालकाने कोतवाली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक पी. एम. लाकडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला. कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband commits suicide