काम नसल्याने वाढली चिडचिड; सतत वाद होत असल्याने पत्नीने गाठले माहेर, इकडे पतीने...

Husband commits suicide after wife Maheri leaves
Husband commits suicide after wife Maheri leaves

अमरावती : कोरोनामुळे लॉकडाउनला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडनेही कठीण होऊन बसले आहे. हाताला काम नाही, नोकरीवर जाता येत नाही व कंपन्या बंद आहेत. यामुळे रोजंदारी करणारा, मजूर, नोकरदार वर्ग घरीच बसून आहे. काम नाही म्हणून पैसे नाही, पैसे नसल्याने चिडचिड वाढली आहे. मग हा राग पत्नी किंवा मुलांवर काढण्यात येतो. अशात एका वादातून पत्नी माहेरी निघून गेली अन्‌ नोको तो प्रकार घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव पवन गणेश श्रीराव... वय 32 वर्षे... हा खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला होता. पत्नी व मुलासह यशोदानगर क्रमांक दोन येथे राहत होता. त्यांचा सुखी संसार सुरू होता. मात्र, देशात कोरोनाने प्रवेश केला आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. कोरोना विषाणुमुळे देशात लॉकडाउन सुरू झाले. यामुळे व्यावसायिकांना आपल्या कंपन्या बंद कराव्या लागल्या. यात पवनच्या कंपनीचाही समावेश आहे. 

दोन महिन्यांपासून कंपनी बंद असल्याने पवन घरीच होता. हाताला काम नाही अन्‌ खायला अन्न नाही. अशा परिस्थितीत पवनची चिडचिड वाढली होती. लॉकडाउनच्या काळात पत्नीशी त्याचे घरगुती कारणावरून भांडण झाले. पत्नीने याकडे दुर्लक्ष केले. नोकरी नसल्याने पती चिडचिड करीत असावे असे तिला वाटत होते. मात्र, पवन सतत वाद घालत होता. रविवारी (ता. 24) त्यांच्यात पुन्हा वाद झाला. मात्र, या वादानंतर पत्नी माहेरी निघून गेली. यामुळे त्याने गळफास लावून आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून आत्महत्येची ही घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

आकस्मिक मृत्यूची नोंद

सतत वाद होत असल्याने पवनला सोडून पत्नी माहेरी निघून गेली. यामुळे पवन तणावात होता. याच तणावातून त्याने गळफास लावून आत्महत्या केली. अशी तक्रार त्याचे काका विनायक प्रीतमराव श्रीराव (60, रा. महादेवखोरी) यांनी फेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com