भावी पत्नीच्या कृत्यामुळे त्याने केली आत्महत्या

अनिल कांबळे
गुरुवार, 7 जून 2018

नागपूर : साखरपुड्यानंतर मोबाईलमध्ये भावी पत्नीचे मित्रांसोबत फोटो -व्हिडिओ बघितल्यानंतर युवकाने लग्नास नकार दिला. त्यामुळे भावी पत्नीने एका मैत्रिणीच्या मदतीने भावी पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवून जीवे मरण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीपोटी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी भावी पत्नी तिची मैत्रिण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. 

बजाजनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन उर्फ बिट्‌टू संजयराव पोटदुखे (वय 28, चिखलगाव, ता. वणी-यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. चेतन हा आरबीआय बॅंकेत अधिकारी पदावर कार्यरत होता तर आरबीआय कॉलनीत राहत होता. नात्यात असलेल्या भावी पत्नीचे बी.एड्‌. झाले होते. दोघांचा 30 एप्रिलला साखरपुडा झाला होता. त्यानंतर 2 जुलैला लग्न ठरले होते. यादरम्यान लग्नापूर्वी दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या. चेतनने तिचा मोबाईल हिसकावला आणि तपासला. त्यावेळी व्हॉट्‌सऍपवर एका मित्रासोबत चॅटिंग चेतनला दिसली. त्याने आक्षेप घेतल्यानंतर तिने "सॉरी' म्हणत विषय बदलविला.

मोबाईलची गॅलरी तपासली असता त्यामध्ये एका मित्रासोबत व्हिडीओ आणि फोटो चेतनला दिसले. त्याने विचारणा केली असता तिने काहीही सांगण्यास नकार दिला. गुणदोषांसह स्विकारण्याची सूचना करून रागारागात निघून गेली. त्यानंतर तिच्या वडीलांशी चर्चा करून लग्न मोडले. मात्र, भावी पत्नी आणि तिची मैत्रिणी यांनी मोबाईलवरून चेतनला पोलिसात खोटी तक्रार करून फसवू तसेच जगणे कठीण करून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे धमकीला कंटाळून चेतनने बुधवारी सकाळी अकरा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

Web Title: husband commits suicide for misbehave of his fiance