नागपुरात पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

रामदास सुकाळकर आणि बेबीताई सुकाळकर असे या मृत पती पत्नीचे नाव आहे. कौंटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूर - नागपुरच्या एमआयडीसी परिसरात आज (बुधवार) पहाटे तीन वाजता पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास सुकाळकर आणि बेबीताई सुकाळकर असे या मृत पती पत्नीचे नाव आहे. कौंटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पतीने चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करत तिची हत्या केली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.

Web Title: husband committed suicide by killing wife in Nagpur