प्रियकरासह पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

अमरावती : आठवड्यापूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना बडनेरा हद्दीतील वडगाव जिरे गावात घडली. बुधवारी (ता. 18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

अमरावती : आठवड्यापूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना बडनेरा हद्दीतील वडगाव जिरे गावात घडली. बुधवारी (ता. 18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
प्रियंका गजानन गजभिये (वय 26, रा. आष्टी, जि. वर्धा) व महेश डोंगरे (रा. वडगाव जिरे), अशी मृतांची नावे आहेत. प्रियंकाचा पती गजानन मारोतराव गजभिये (वय 30, रा. आष्टी) हा पसार आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रियंकाची काही दिवसांआधी महेशसोबत ओळख झाली होती. दोघांच्या भेटीगाठी वाढल्याची कुणकूण पती गजानन याला लागली होती. त्यावरून गजभिये दाम्पत्यामध्ये वादही सुरू होता. आठवड्यापूर्वी प्रियंका ही महेशसोबत पळून वडगाव जिरे या गावात राहत होती. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग गजाननच्या डोक्‍यात होता. तो दोघांच्या शोधासाठी बुधवारी (ता. 18) दुपारी दोनच्या सुमारास आष्टीवरून वडगाव जिरे गावात आला. त्याने पत्नी प्रियंका व महेश या दोघांना गावातच गाठले. दोघांसोबत पुन्हा गजानन याचे भांडण झाले. त्यातूनच संतापाच्या भरात गजाननने पत्नी प्रियंका व महेश डोंगरे या दोघांवर सोबत आणलेल्या चाकूने सपासप वार करून त्यांचा खून केला. हा प्रकार सायंकाळी ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला. पत्नी व प्रियकराच्या खुनानंतर गजानन गजभिये पसार झाला. खुनानंतर पोलिस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, उपायुक्त शशिकांत सातव, गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्रामसह श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञ आणि न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळचे पथक उशिरापर्यंत वडगाव जिरे गावातच तळ ठोकून होते. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

Web Title: Husband killed wife

टॅग्स