नागपूर: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

रुणालि रामकृष्ण डायरे (वय 34) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रुणाली एका कारखान्यात काम करीत होती. तेथील एका व्यक्तिसोबत तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय आरोपी पती रामकृष्ण डायरे यास होता.

बुटिबोरी (जि. नागपूर) : एमआयडीसी परिसरातील टाकलघाट कटरे कॉलोनी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशय घेत पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना आज (गुरुवार) सकाळी उघडकिस आली.

रुणालि रामकृष्ण डायरे (वय 34) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रुणाली एका कारखान्यात काम करीत होती. तेथील एका व्यक्तिसोबत तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय आरोपी पती रामकृष्ण डायरे यास होता. यावरून दोघांत वाद होता. यावरुन पोलिसात तक्रार झाली होती. बुधवार रात्री दोघांचे भांडण झाले. पहाटे 4 च्या सुमारास आरोपीने हत्या केली. मृतास 3 अपत्य आहेत. बुटिबोरी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: husband killed wife in Nagpur

टॅग्स