पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

तिरोडा (जि. गोंदिया) - पत्नीचे गावातील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. वारंवार सांगूनही तिने ऐकले नाही. त्यामुळे पतीने आत्महत्या केली. ही घटना तालुक्‍यातील कवलेवाडा येथे आज, सोमवारी उघडकीस आली. रमेश नरबद पटले असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तिरोडा (जि. गोंदिया) - पत्नीचे गावातील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. वारंवार सांगूनही तिने ऐकले नाही. त्यामुळे पतीने आत्महत्या केली. ही घटना तालुक्‍यातील कवलेवाडा येथे आज, सोमवारी उघडकीस आली. रमेश नरबद पटले असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

वाहनचालक रमेश पटले कवलेवाडा येथे पत्नी व तीन मुलांसह राहत होता. वाहनचालक असल्याने तो अनेकदा दोन-तीन दिवस प्रवासात राहत असे. रमेशची पत्नी रिता पटले हिचे गावातील झामसिंग रहांगडाले याच्यासोबत अनैतिक संबंध होते. याबाबत अनेकदा पतीने पत्नीला तसेच रहांगडाले याला समजावले होते. घटनेच्या दोन दिवस आधी रमेश बाहेरगावी गेला असता सकाळी १० वाजताच्या सुमारास झामसिंग रमेशच्या घरी गेला. गावकऱ्यांनी धानाच्या कोठारीत लपलेल्या झामसिंगला बाहेर काढून मारहाण करून तसेच दोघांनाही समजावून सोडून दिले. 

रविवारी (ता. १) पती रमेश परत येताच घडलेला प्रकार त्याला समजला. नैराश्‍यात तो तिरोडा येथे निघून गेला. त्याच रात्री विष प्राशन करून शेतातील झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केली. आज, सोमवारी सकाळी ही घटना गावकऱ्यांच्या लक्षात आली. मृत्यूपूर्वी रमेशने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाविषयीचा उल्लेख करीत आपणाला झामसिंग याने जिवे मारण्याची धमकी दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले.

गावात तणाव
पोलिस दोन्ही आरोपींना अटक करीत नाहीत, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत गावात तणाव होता. दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविला असून झामसिंग फरार असल्याचे समजते. 

Web Title: husband suicide by wife Immoral relationship crime