पहिली असताना ‘त्याने’ थाटला दुसरा संसार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

दोघींनाही हवा एकच पती
पोलिस ठाण्यात पोहचलेल्या या प्रकरणात दोन्ही महिलाना एकच पती हवा असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते. पती जे म्हणेल तेच आम्ही करू अशी भूमिका घेतल्यामुळे दोन्ही महिलांच्या नातेवाईकांसोबत पोलिसांचेही हात टेकले होते. हा प्रकार शहरातील एका पोलिस ठाण्यात काही काळ सुरू होता.

अकोला : ‘दोन बायका अन् फजिती ऐका’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. पहिली असताना दुसरी करून दोघींचाही विश्वासघात करणाऱ्या पतीने दोघींचीही फजिती केल्याची घटना शहरात उघडकीस आली. दोघींची समजूत काढण्यात अपयश आल्याने पती दिसेनासा झाला खरा. मात्र, महिलांनी बाचाबाची करत चक्क पोलिस ठाणेच गाठले. दोघीनीही पोलिसांसमोर आप-आपली कैफियत मांडली. हा प्रकार शुक्रवारी शहरातील एका पोलिस ठाण्यात घडत होता अन् पोलिस ऐकत होते.

पती बेरोजगार अन् त्यातच दोन बायका. एकीला शहराच्या या भागात ठेवले, तर दुसरीला शहराच्या त्या बाजूला. पहिलीला पतीने दुसरे लग्न केले हे काही दिवसानंतर माहिती पडले पण समजूतदारपणा घेऊन तिचाही सांभाळ करा अन् माझा सांभाळ कराची भूमिका घेतली. पहिलीला एक मुलगा तर दुसरी एक मुलगी. संसार सुरळीत सुरू असतानाच मात्र काही कारणावरून खटके उडायला सुरूवात झाली. मात्र, गुरुवारी दोघीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि गल्लीवर आले. शेवटी वाद मिटवण्यासाठी वाद पोलिस ठाण्यात जाऊन पोहचला. पोलिसांनी दोन्ही महिलांची बाजू समजून घेतली अाणि कलम १६० अन्वये प्रकरण दाखल केले. असे असताना मात्र, दोन्ही महिला ठाण्यात उपस्थित असताना पती दिसेनासा झाला होता.

दोघींनाही हवा एकच पती
पोलिस ठाण्यात पोहचलेल्या या प्रकरणात दोन्ही महिलाना एकच पती हवा असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते. पती जे म्हणेल तेच आम्ही करू अशी भूमिका घेतल्यामुळे दोन्ही महिलांच्या नातेवाईकांसोबत पोलिसांचेही हात टेकले होते. हा प्रकार शहरातील एका पोलिस ठाण्यात काही काळ सुरू होता.

Web Title: husband took another marriage in Akola