दोन बायकांच्या दादल्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

अमरावती : पहिले लग्न झाले असताना, पुन्हा दुसरे लग्न करून विश्‍वासघात केल्याने दुसऱ्या पत्नीने रविवारी (ता. 11) गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी मोरेश्वर भाकरे (रा. कृष्णापूर, चांदूरबाजार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोरेश्वर याचे काही वर्षांपूर्वी पहिले लग्न झाले होते. त्यानंतर त्याची अमरावतीत राहणाऱ्या विधवा महिलेसोबत ओळख झाली. तिने मोरेश्वरवर विश्‍वास ठेवला. दोघांनी एका मंदिरात लग्न केले. लग्न करण्यापूर्वी मोरेश्वरने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचे दुसरीला सांगितले होते. त्यामुळे पहिल्या लग्नात मिळालेले दागिने तिने मोठ्या विश्‍वासाने मोरेश्वरजवळ दिले. त्याने दुसऱ्या पत्नीचे दागिने विकून पैसे उडवून विश्‍वासघात केला. दुसऱ्या पत्नीचा त्याने शारीरिक, मानसिक छळ करणे सुरू केले होते. त्याच्या त्रासाला कंटाळल्यामुळे ती पोलिस ठाण्यात पोहोचली. अखेर दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोरेश्वरविरुद्ध विश्‍वासघात, मारहाण, शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husbund arested having Two wives