हैदराबाद-जयपूर एक्‍स्प्रेसमध्ये दोन लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

अमरावती : हैदराबाद येथून अकोल्याला येणाऱ्या एका महिला प्रवाशाचा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी अकोल्यानजीक वाशीम स्थानकाजवळ लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार अकोला रेल्वेपोलिसांत करण्यात आली.

अमरावती : हैदराबाद येथून अकोल्याला येणाऱ्या एका महिला प्रवाशाचा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी अकोल्यानजीक वाशीम स्थानकाजवळ लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार अकोला रेल्वेपोलिसांत करण्यात आली.
हैदराबाद येथील प्रफुल्ल रामभाऊ खेरडे हे त्यांच्या पत्नी संगीता खेरडे यांच्यासोबत हैदराबाद-जयपूर एक्‍स्प्रेसने अकोल्याला येत होते. एस-8 या कोचमध्ये ते होते. शनिवारी (ता. 15) पहाटे साडेतीनच्या सुमारास गाडी हिंगोली येथे आली व त्याच्या पाच मिनिटांतच श्री. खेरडे यांच्या पत्नीची पर्स एकाने हिसकावून पळ काढला. या पर्समध्ये 700 रुपये रोख, 1 लाख 25 हजार रुपयांचे मंगळसूत्र, 50 हजार रुपयांचा सोन्याचा हार, मोबाईल तसेच अन्य ऐवज होता.
दरम्यान, श्री. खेरडे यांनी वाशीममध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. या एक्‍स्प्रेसमध्ये एकही सुरक्षा कर्मचारी किंवा टीसीसुद्धा नव्हता, असे श्री. खेरडे यांचे म्हणणे आहे.
या ट्रेनच्या रिझर्व्ह बोगीत अनेक लोक चढले व त्यातील पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने पर्स हिसकली. वाशीम स्थानकावर श्री. खेरडे यांनी चेन ओढून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबलीही; परंतु त्यांची पत्नी गाडीखाली उतरली असता गाडी परत सुरू करण्यात आली. त्यामुळे त्या धावतच गाडीत चढल्या; अखेर त्यांना अकोला रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली.
प्रवाशांनो, सावधान!
माझ्यासोबतही घटना घडली, रेल्वे किंवा पोलिसांकडून योग्य ते सहकार्य मिळाले नाही. मात्र, यापुढे कुणालाही अशा घटनेचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे सर्वांनी दक्ष राहूनच प्रवास करावा, असे आवाहन खेरडे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad-Jaipur express train worth Rs 2 lakh