जागतिक अंध दिन विशेष : अशिक्षित अंध शकुंनाबाई गाते शेकडो भजने

शरद शहारे
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

वेलतूर (जि. नागपूर): येथील अशिक्षित अंध शकुंनाबाई हरीनामाचा गजर करत शेकडो भजने टाळ-पखवाजाच्या आवाजावर गाऊन भागवतभक्तीचा ठसा जनमानसात रुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहेत. विठ्ठलभक्त शकुंतला जन्मजात अंध आहेत. मात्र, त्यांचा भजनाचा छंद त्यांची आता ओळख झाली आहे. 

वेलतूर (जि. नागपूर): येथील अशिक्षित अंध शकुंनाबाई हरीनामाचा गजर करत शेकडो भजने टाळ-पखवाजाच्या आवाजावर गाऊन भागवतभक्तीचा ठसा जनमानसात रुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहेत. विठ्ठलभक्त शकुंतला जन्मजात अंध आहेत. मात्र, त्यांचा भजनाचा छंद त्यांची आता ओळख झाली आहे. 
हरीपाठ, पसायदान, ज्ञानेश्वरीतील अनेक ओव्या त्यांना मुखोद्‌गत असून वारकरी संप्रदायातील त्यांची भजने व ओव्या ऐकणाऱ्यास भक्ती रसात बुडविणाऱ्या ठरत आहेत. अंधत्वामुळे संसारिक व कौटुंबिक जीवन त्यांच्या वाट्याला आले नसले तरी नात्यापलीकडचा जीवाभावाचा समृद्ध शेजार निर्माण करण्यास त्या यशस्वी ठरल्या आहेत. याच नात्याच्या जोरावर कुणाची बहीण, आत्या, मावशी, आई, आजी झाल्या आहेत. हे नाते जपताना त्यांनी पेरलेला मायेचा ओलावा साऱ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करतो. कुठलीही अपेक्षा न करता केवल पोट भरेल एवढ्या अन्नाच्या मोबदल्यात अनेक गरजवंतांकडची धुणीभांडी करून त्या उदरनिर्वाह करीत आहे. वयाच्या साठीतही त्या गरजवंताला मदत करण्यास नेहमीच तयार असतात. अंधत्वाला कधीच त्यांनी स्वत:ची कमतरता बनविले नाही. अपंगासाठीच्या अनेक सवलती असूनही त्यांना मिळाल्या नसल्या तरी नेत्यांची आश्‍वासने भरपूर मिळतात. 
अंधांना सोयीसवलती व रोजगार शिक्षणासह त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वंकष प्रयत्न चालविण्याची आज गरज आहे. अंध विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या समस्या आहेत त्या सोडवाव्यात, असे मत राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या अर्चना शहारे यांनी व्यक्त केले. 

ग्रामीण भागात अंधाच्या अनेक समस्या 
शकुंतलाबाईचा सेवाभावाचा अध्याय त्यांना जागतिक अंधदिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा करण्यास भाग पाडणारा आहे. 15 ऑक्‍टोबर सर्व जगात जागतिक अंधदिन म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेत प्रथम 1964 पासून ही परंपरा सुरू झाली आहे. ती आजतागायत कायम असून भारतातही ती साजरी केली जाते. पण, अजूनही तिच्यात डोळसपणाची गरज आली नसल्याची खंत जाणकार व्यक्त करीत आहेत. ती वाढवण्याचे आवाहन सामाजिक संघटनानी केले आहे. ग्रामीण भागात ही अंधांची मोठी संख्या असून ते अनेक समस्यांना तोंड देत आहेत. 

अंधदिन साजरा करताना त्यांच्यासाठी काय करता येईल व केले पाहिजे याचा विचार होतो. हा विचार वर्षातून एकच दिवस होऊ नये, तर तो निरंतर व्हायला हवा. 
- विकास रायपूरकर,
सामाजिक कार्यकर्ते 

शकुंतलाबाईंचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे. आत्मनिर्भरतेचा धडा त्यांनी आपल्या राहणीमानातून वेलतूरकरांना दिला आहे. नमन. 
- ग्यानीवंत साखरवाडे,
फ्रेंडस ग्रुप वेलतूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hymns sing to the uneducated blind