esakal | मी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले : नाना पटोले
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

मी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले : नाना पटोले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : आम्हीच राज्याचा विकास केला, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. आम्ही या पोकळ घोषणेचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आव्हान दिले होते. हे आव्हान मी स्वीकारले असून कुठेही चर्चेसाठी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, असे प्रतिआवाहन माजी खासदार तथा कॉंग्रेसचे राज्य प्रचार समितीप्रमुख नाना पटोले यांनी दिले.
ते स्थानिक टिंबर भवन येथे आज आयोजित कॉंग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेत बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार यशोमती ठाकूर, माजी खासदार राजीव सातव, आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. वझाहत मिर्झा, बाबासाहेब गाडे पाटील, जीवन पाटील, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, नगरसेविका वैशाली सवाई आदी उपस्थित होत्या.
पटोले म्हणाले की, सरकार दबावतंत्राचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मी बोलत असल्याने माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. विकास केल्याची वातावरणनिर्मिती केली जात आहे. शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्‍न कायम आहेत. गरिबांचे प्रश्‍न आम्ही सोडवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. माझ्या मते देशात दोनच गरीब आहेत. एक अदानी तर दुसरे अंबानी, असेही नाना पटोले म्हणाले.

विरोधी पक्षात शिवसेना असेल
भाजप सध्या भ्रष्टाचाऱ्यांची मेगाभरती करीत आहे. त्यांना बेरोजगार युवकांच्या प्रश्‍नांशी काही देणेघेणे नाही. पाच वर्षांत शेतकऱ्यांची चेष्टा सरकारने केली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी सत्तेवर येईल तर विरोधी पक्षात शिवसेना असेल, भाजप कुठेही नसणार, असे भाकीत नाना पटोले यांनी केले आहे.

loading image
go to top