मी पुन्हा येतोय, आपण विजयाचा जल्लोष करू : देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नागपूर : मी पुन्हा येतोय. आपण विजयाचा जल्लोष साजरा करू, असा विश्‍वास व्यक्त करून मतदानाचा दिवस युद्धदिन समजून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी सकाळी जाहीर सभेत केले.
आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी "रोड शो' करून शक्तिप्रदर्शन केले. यानंतर सकाळी 11 वाजता दिनदयाल नगर येथे सभा घेतली. ते म्हणाले, पाच वर्षांत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या

नेतृत्वात आपण नागपूर शहराचे चित्र पालटले आहे. संपूर्ण राज्यात आपल्याला प्रचंड मोठे मताधिक्‍य प्राप्त होणार आहे. असे असले तरी प्रत्येकाने दक्ष रहावे. सोमवारी (ता.21) मतदानाचा दिवस भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने युद्धदिनासारखा पाळावा, असेही ते म्हणाले.
मी संपूर्ण राज्यात फिरत आहे. पाच वर्षे भाजप सरकारने केलेले पारदर्शी काम आपण मतदारांपर्यंत पोहोचवले असून, विजयाचा जल्लोष भाजप साजरा करणार आहे. मी पुन्हा येतो आहे. आपण सामूहिकपणे जल्लोष करू, असा विश्‍वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्तांमध्ये निर्माण केला. सभेला संदीप जोशी, मुन्ना यादव, अनिवान ठाकरे यांच्यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am coming again, we will celebrate the victory: Devendra Fadnavis