मेयोच्या अतिदक्षता वॉर्डात  नातेवाइकांकडून तोडफोड 

मेयोच्या अतिदक्षता वॉर्डात  नातेवाइकांकडून तोडफोड 

नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो) मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात भरती असलेल्या महिलेचे निधन झाले. डॉक्‍टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करती संतप्त झालेल्या नातेवाइकांनी अतिदक्षता वॉर्डात तोडफोड केली. सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात चार तास तणावाचे वातावरण होते. दरम्यान, नातेवाइकांनी घातलेल्या या गोंधळात मेयोतील चतुर्थश्रेणी कर्मचारी जखमी झाला आहे. यावेळी सुरक्षारक्षक मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. 

मेयो रुग्णालयात नातेवाइकांसोबत डॉक्‍टरांचे खटके उडणे नवीन नाही. परंतु, या प्रकरणात डॉक्‍टरांनी महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे प्रारंभीच सांगितले. रात्री साडेदहाच्या सुमारास मोमिनपुरा येथील रहिवासी निगम बानो (वय 42) यांना छातीत दुखू लागल्याने नातेवाइकांनी मेयोत आणले. तपासणीदरम्यान कोरोनरी सिंड्रोम असल्याची लक्षणे दिसू लागली. यामुळे तातडीने "इको' काढण्यात आला. बानो यांना मेयोत आणले त्यावेळी प्रकृती गंभीर झाली होती. कर्तव्यावरील निवासी डॉक्‍टरांनी भरती करावे लागेल असे नातेवाइकांना सांगितले. परंतु, नातेवाइकांनी नकार दिला. ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर मध्यरात्रीनंतर 3 च्या सुमारास पुन्हा बानो यांची प्रकृती खालावली. तेव्हा नातेवाईक भरती करून घेण्यास तयार झाले. त्यानंतर त्यांना स्त्री रोग विभागातील वॉर्ड नंबर 5 मध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी बानो यांचा रक्तदाब कमी झाला होता. डॉक्‍टरांनी सीपीआर देऊन श्वास सुरू करण्याचा प्रयत्न केला. या घडामोडीत त्यांची प्रकृती आणखी ढासळली आणि सकाळी आठच्या सुमारा बानो यांचे निधन झाले. मात्र, नातेवाईक संतप्त झाले आणि नातेवाइकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. 

निवासी डॉक्‍टरांकडून निषेध 
गेल्या काही दिवसांपासून मेयोत मारहाणीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच निवासी डॉक्‍टरांमध्ये प्रचंड दहशत आहे. मारहाणीच्या घटना पाहता मेयोतील महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मेयोतील निवासी डॉक्‍टरांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मार्डच्या नेतृत्वाखाली कॅंडल मार्च काढला. मार्डचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड, जनरल सेक्रेटरी डॉ. अंतिलेश टेकाम, डॉ. गोविंदा चंद्राकर यांच्या नेतृत्वात सुमारे दोनशेवर निवासी डॉक्‍टर सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com