जनजागृतीसाठी "आदर्श मतदान केंद्र' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

हिंगणा  (जि.नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मतदानासाठी धनगरपुरा जिल्हा परिषद शाळेत आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले. लोकशाही उत्सवातील या उपक्रमात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे मतदानाच्या टक्‍केवारीतही वाढ झाली आहे. 

हिंगणा  (जि.नागपूर) : हिंगणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान मतदानासाठी धनगरपुरा जिल्हा परिषद शाळेत आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले. लोकशाही उत्सवातील या उपक्रमात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे मतदानाच्या टक्‍केवारीतही वाढ झाली आहे. 
हिंगणा विधानसभेच्या मतदानासाठी मतदानाची टक्‍केवारी वाढावी, या उद्देशाने आदर्श मतदान केंद्राची संकल्पना झोनल अधिकारी कृष्ण मोहनराव यांनी मांडली. नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. ऋचा धाबर्डे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेची निवड केली. या मतदान केंद्राची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली. परिसरात भव्य असा शामियाना उभारण्यात आला. आकर्षक फुग्यांचे सजावट असलेले प्रवेशद्वार तयार करण्यात आले. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिक आल्यास त्यांना आकर्षक अशा खुर्च्या बसण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे मतदान केंद्र परिसर पूर्ण स्वच्छ व सुंदर ठेवण्याची भूमिका घेण्यात आली. यानुसार मतदान केंद्र परिसरात कचरा होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. 
आदर्श मतदान केंद्र पाहून मतदारांमध्येही उत्साह संचारला. मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्राच्या परिसरात विश्राम केला. आकर्षक सजावट पाहून बालगोपालही मतदान केंद्र परिसरात आले होते. नगरपंचायत प्रशासनाने आदर्श मतदान केंद्र तयार केल्याने या ठिकाणी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री रमेशचंद्र बंग यांनी या केंद्राला भेट दिली. आजच्या निवडणुकीत या आदर्श मतदान केंद्राची चर्चा संपूर्ण हिंगणा परिसरात सुरू आहे. या उपक्रमाला नगरपंचायत कर्मचारी अमोल घोडमारे, प्रशांत गोडे, अक्षय लढी, महेश कांबळे, संजय राऊत, संजय माहुरे, चैतन्य कल्पना कोल्हे या कर्मचाऱ्यांनी यशस्वी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Ideal polling station" for public awareness

फोटो गॅलरी