esakal | "आदर्श शिक्षक' निवड करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

"आदर्श शिक्षक' निवड करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी

"आदर्श शिक्षक' निवड करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षकांचे काम, शिकविण्याची पद्धत पाहून "आदर्श शिक्षक' कोण याची निवड करण्यात येणार आहे. याकरिता सर्व विभागप्रमुखांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले असून प्रत्येकास एका तालुक्‍याची जबाबदारी देण्यात आली आहे.

शिक्षकांनी केलेल्या अर्जाच्या आधारे निवड करता प्रत्यक्ष शाळेत जाऊन काम पाहण्याचा निर्णय सीईओंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ठराव समितीत घेण्यात आला. प्रत्येक विभागप्रमुखाकडे एक तालुका देण्यात येणार आहे. हे विभागप्रमुख प्रत्यक्ष शाळेला भेट देतील. शिक्षकाच्या कामाची पद्धत, शिकविण्याची पद्धत, शाळेबद्दल त्याला असलेली आपुलकी, त्याचा व्यवहार आदी बाबींची तपासणी करतील. याआधारे आपला अहवाल सीईओंना देतील. त्यानंतरच आदर्श शिक्षकसाठी निवड होणार आहे.
loading image
go to top