कर्जमाफी न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

संग्रामपूर (बुलढाणा) : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत कर्ज माफ झाले नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यानी बँकांसमोरच उपोषणाला बसण्याचा आणि वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत 28 आगस्ट रोजी तालुक्यातील 70 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निशी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरूनही 25 आगस्ट पर्यंत कर्ज माफी झालेली नाही. यामध्ये  तालुक्यातील बरेच शेतकरी अजूनही वंचित आहेत. बँकेमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना अधिकारी उडवा उडवीचे उत्तरे देऊन सन्मान जनक वागणूक देत नाहीत. आता पर्यत बँकांकडून किती शेतकऱयांना या योजने अंतर्गत कर्ज माफी देण्यात आली याची यादी बँकांनी लावाव्यात आणि निबंधक कार्यालयाला माहिती द्यावी.

शासनाकडून अधिकारी आदेश देत असताना बँक अधिकारी आदेशाचे पालन करीत नसल्याचे दिसत आहेत. हे खरीप हंगाम होण्याचे मार्गावर असताना पीक कर्ज वाटपास होणाऱ्या विलंबावरून दिसून येते. प्रशासनाने लक्ष घालून तातडीने कर्ज वाटप करावे. अन्यथा 4 सप्टेंबरला तालुक्यातील शेतकरी संग्रामपुरात स्टेट बँक व बँक ऑफ महाराष्ट्र शाखे समोर उपोषणाला बसणार आहेत. उपोषणाला बसल्या नंतर आठ दिवसाचे आत दखल घेतली नाही तर आत्मदहन करण्यात येईल. अश्या इशाऱ्याचे निवेदन संग्रामपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर जवळपास 70 शेतकऱ्याच्या सह्या आहेत.

Web Title: If not relief loan waived than self immolation