खोल्या रिकाम्या न केल्यास "रस्टिकेट'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

खोल्या रिकाम्या न केल्यास "रस्टिकेट'
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय वसतिगृहात अवैध राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. 28) पाच वाजेपर्यंत खोल्या रिकाम्या करण्याची मुदत दिली आहे. मुदतीत खोल्या रिकाम्या न करणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्याची भूमिका कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी घेतली आहे.

विद्यापीठाकडून वसतिगृहातील 119 विद्यार्थ्यांना 30 जुलैपर्यंत वसतिगृह खाली करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वसतिगृह खाली न झाल्याने विद्यापीठाने विनापरवानगी राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोल्यांना टाळे ठोकले. सोमवारी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. मात्र, कुलगुरूंनी मागणी फेटाळली. तसेच विद्यापीठात प्रवेश नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडावे लागणार आहे.
क्षमता असणाऱ्यांनी घ्यावा लाभ
विद्यार्थ्यांनी नेल्सन मंडेला वसतिगृहात राहण्याची परवानगी मागितली होती. तीसुद्धा देण्यास विद्यापीठाने नकार दिला. नेल्सन मंडेला हे विदेशी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. येथील वार्षिक शुल्क हे वर्षाला बारा हजार रुपये आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची क्षमता असेल त्यांनी या वसतिगृहाचा लाभ घ्यावा, असेही कुलगुरूंनी सांगितले.

Web Title: If the rooms are not empty, then rusticate

टॅग्स