भरती व्हायचेय तर गादी, बेडशीट घरून आणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नागपूर - ज्याचे नाही कोणी त्याचे आहे मेडिकल असा सर्वसाधारण समाजामध्ये समज आहे. आजही मेडिकलवर गरिबांचा विश्‍वास आहे. यामुळे दर दिवसाला दोन हजारांवर रुग्णांची नोंद होते. परंतु, सरकारच्या उदासीनतेमुळे मेडिकलच्या विविध विभागांवर अवकळा पसरत चालली आहे. अलीकडे रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वॉर्डात फ्लोरवर रुग्ण दिसतात. यांना गादी आणि बेटशीट उपलब्ध करून देण्यात मेडिकल प्रशासन अपयशी ठरत आहे. यामुळे जमिनीवर ठेवण्यात आलेल्‍या रुग्णांसाठी नातेवाईक घरूनच गादी आणि बेटशीट आणतात, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मेडिकलचे हे नवे रूप शासन आणि प्रशासनाला लाजवणारे आहे, हे मात्र नक्की. 

मेडिकलमध्ये १७०१ खाटा आहेत. ५० वॉर्ड आहेत. आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे हॉस्पिटल अशी ओळख आहे. मध्य भारतात उत्तम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या प्रयत्नातून साकारले आहे. सारेकाही आलबेल आहे. मात्र, रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीची घटना आहे. पाटणसावंगी येथील प्रकाश देऊळकर हा रुग्ण नुकतेच मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक २६ मध्ये भरती झाला होता. दोन-तीन दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला. मात्र, भरतीचा कार्ड बनला. वॉर्डात भरती होण्यासाठी घेऊन गेले असता, त्याला जमिनीवर ठेवण्यात आले. गादी मात्र दिली नाही. यामुळे नातेवाइकांनी चक्क पाटणसावंगीवरून गादी आणली. उपचारातून बरा झाल्यानंतर देऊळकर यांना वॉर्डातून डिस्चार्ज देण्यात आले. सुटी झाल्यानंतर स्ट्रेचरवरून खाली सोडण्यात आले. त्यावेळी स्ट्रेचरवर देऊळकर यांच्या बाजूला गादी होती. नातेवाइकांना विचारले असता, पाटणसावंगीवरून गादी आणल्याचे त्यांनी सांगितले. 

पंखादेखील  आणला होता
उकाड्याचे दिवस होते, मे महिन्यात महिलेच्या प्रसूतीनंतर साईड रूम देण्यात आली. मात्र, साईड रूममध्ये पंखा नव्हता. अशावेळी महिलेच्या पतीने चक्क घरून पंखा आणला होता, हा अनुभव एका नातेवाइकाने सांगितला.

Web Title: If you want to get admitted to the hospital bring bed bedsheet from home