दारूविक्रेत्याचा माल ठेवला झाली तीन वर्षांची शिक्षा 

संदीप रायपुरे
शनिवार, 7 जुलै 2018

तेलंगणाला प्रातांच्या सिमेलगत गोडपिपरी तालूका आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तिन वर्षापासून दारूबंदी आहे. पण गावागावात दारूच दारू उपलब्ध आहे. याकामात असणारे मोठे मासे विविध माध्यमातून दारूचे जाळे रूजवित होते. ठाणेदार प्रविण बोरकुटे यांना दारूसाठ्याची माहिती मिळाली. अन त्यांनी गोंडपिपरी तालूक्यातील जोगापूर येथील कमलाबाई लाटकर यांच्या घरी धाढ टाकली. व 144 दारूच्या पेट्या जप्त केल्या.

गोँडपिपरी जि.चंद्रपूर : तीन वर्षापासून दारूबंदी असलेल्या चँद्रपुरात दारूच दारू आहे. प्रविण बोरकुटे यांनी गोडपिंपरी ठाणेदाराचे सूत्र हातात घैतले.अन त्यांनी दारूला मोठाच लगाम लावला. यादरम्यान कार्यवाही करताना त्यांनी जोगापूरातील एका वयोवृध्द महिलेच्या घरातून एकशे चवेचाळीस दारूच्या पेट्या जप्त केल्या. तपासात दारू तस्करांची नावे आलीत. त्यांनाही आरोपी बनवून ठाणेदारांनी कोर्टात प्रकरण दाखल केले.

आज निकाल आला. वयोवृध्द महिलेला तिन वर्षाची शिक्षा सोबत पंचेवीस हजार रूपयाचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार असणाऱ्या मुख्य सुत्रधारांना मात्र निर्दोष सोडण्यात आले.

तेलंगणाला प्रातांच्या सिमेलगत गोडपिपरी तालूका आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तिन वर्षापासून दारूबंदी आहे. पण गावागावात दारूच दारू उपलब्ध आहे. याकामात असणारे मोठे मासे विविध माध्यमातून दारूचे जाळे रूजवित होते. ठाणेदार प्रविण बोरकुटे यांना दारूसाठ्याची माहिती मिळाली. अन त्यांनी गोंडपिपरी तालूक्यातील जोगापूर येथील कमलाबाई लाटकर यांच्या घरी धाढ टाकली. व 144 दारूच्या पेट्या जप्त केल्या.

पंचनामे करण्यात आले.पोलीसांनी चौकशी केली. यात हरमेनसिंग डांगी व इतर तिन प्रमुख सुत्रधार आसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी कोर्टात प्रकरण दाखल केले. आज गोंडापिंपरीच्या न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यानंतर दारूसाठा ज्या माहिलेच्या घरी सापडला. तिला तीन वर्षाची शिक्षा व पंचेवीस हजाराचा दंड ठोठावण्यात आला. उर्वरित आरोपींना मात्र निर्दोष सोडण्यात आले या निकालानंतर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Web Title: illegal liquor sale in Chandrapur