अवैध पेट्रोल विक्रेत्यांचा सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

एटापल्ली - नियम धाब्यावर बसवून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध पेट्रोल विक्रीमुळे वाहनचालकांची आर्थिक लूट केली जात आहे. मात्र, याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्वलनशील पदार्थ्याच्या सुरक्षेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात आजही काही तालुक्‍यांच्या ठिकाणी पेट्रोलपंप नाहीत. एटापल्ली येथील पंचायत समितीच्या मालकीचा विकास सर्व्हिस सेंटर हा एकमेव पेट्रोल पंप असून पंचायत समिती प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे एक महिन्यापासून तो बंद आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अवैध पेट्रोल व डिझेल विक्रेत्यांकडून ग्राहकांची मात्र लूट केली जात आहे. 

नागरिकांच्या सोईसाठी शासनाने एटापल्ली येथे 2003 साली पंचायत समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप सुरू केला. मात्र, नेहमीच या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा असतो. त्यामुळे पंचायत समिती प्रशासन व अवैध पेट्रोल-डिझेल विक्रेते संगनमताने पेट्रोल पंप बंद ठेवत असावे, अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. पेट्रोल पंपावर 72 रुपये दराने मिळणारे पेट्रोल अवैध विक्रेत्यांकडून शंभर रुपयात 900 मिलीलिटर दराने विकले जाते. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून बंद असलेला पेट्रोल पंप त्वरित सुरू करावा, अशी मागणी वाहनधारक नागरिकांनी केली आहे. 

नियम धाब्यावर 
ज्वलनशील पदार्थ विक्रीसाठी शासनाने नियम व अटी लादल्या आहेत. परंतु नियमाचे उल्लंघन करून ग्रामीण भागातील गावागावांत अनेकांनी पेट्रोल विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. लीटरमागे 20 ते 30 रुपये अवैध विक्रेते लुटत आहेत. त्यातच रॉकेल भेसळ करून पेट्रोलची विक्री करण्यात येत असल्याने वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध पैट्रोल विक्रेत्यांवर प्रशासनाकडून आजपर्यंत एकदाही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: illegal petrol vendors