"रॉयल्टी'वर खोडतोड करून अवैध वाळूवाहतूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

टेकाडी (जि.नागपूर):  एकाच रॉयल्टीवर खोडतोड करून वारंवार वाळू वाहतुकीचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. प्रकरण महसूल विभागाच्या सुपूर्द करून तपासात घेतले आहे. महसूल विभागाच्या कार्यवाहीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

टेकाडी (जि.नागपूर):  एकाच रॉयल्टीवर खोडतोड करून वारंवार वाळू वाहतुकीचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. प्रकरण महसूल विभागाच्या सुपूर्द करून तपासात घेतले आहे. महसूल विभागाच्या कार्यवाहीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 
अवैध वाळू वाहतूक रोखण्याची जबाबदारी महसूल विभाग आणि पोलिस विभागावर आहे. परंतु, महसूल विभाग नि पोलिसांच्या चिरीमिरीच्या प्रकरणाने वाळूमाफिया नदी घाटावरून अवैध वाळू वाहतूक करीत असतात. कन्हान नदीकाठावर असलेला नेरी वाळूघाट शासकीय दराने लिलावात दिला गेला आहे. घाटावरून अनेक ट्रॅक्‍टर वाळू भरून रॉयल्टी घेऊन चालतात. परंतु, वाळू भरलेला ट्रॅक्‍टर हा एकाच रॉयल्टीवर खोडतोड करून दिवसभर अवैधरित्या वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती कन्हानचे एपीआय प्रमोद पवार यांना मिळाली. 7 सप्टेंबर रोजी महामार्गावर वाळू वाहणाऱ्या ट्रॅक्‍टरचा तपास सुरू असताना ट्रॅक्‍टर (क्र.एमएच 40 एल 8009) या नंबरचे ट्रॅक्‍टर एकाच रॉयल्टीवर वाळू वाहून नेत असून रॉयल्टीवर खोडतोड असल्याचे आढळले. यावर महसूल विभागाला सूचना देऊन ट्रॅक्‍टर टॉली कन्हान पोलिस ठाण्यात जमा करून महसूल विभागाला या प्रकरणी माहिती देण्यात आली. हे प्रकरण सध्या महसूल विभागाच्या सुपूर्द असून रॉयल्टीवर खोडतोडप्रकरणी तपास करून दोषी आढळल्यास योग्य तो दंड ठोठावणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 
रॉयल्टी खोडतोड प्रकरणात ट्रॅक्‍टर मालकाला नोटीस दिली आहे. बुधवारी तहसील कार्यालयात हजर होऊन रॉयल्टी प्रकरणात स्पष्टीकरण सादर करणार आहे. त्यानंतर दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. 
वरुणकुमार सहारे 
तहसीलदार, पारशिवनी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal sand trafficking on "royalties"