निवासी गाळ्यांमध्ये अवैध भाडेकरू

नागपूर : टीबी वॉर्ड परिसरातील अतिक्रमण.
नागपूर : टीबी वॉर्ड परिसरातील अतिक्रमण.

नागपूर : मागील चार वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणावरून टीबी वॉर्डातील इमारतींना टाळे लावण्यात आले. परंतु, परिसरात काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने येथील जीर्ण झालेले निवासी गाळे अवैधरीत्या भाड्याने दिल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या निवासी गाळ्यांच्या परिसरात अतिक्रमण होत असल्याचे दिसून येते. याकडे मेडिकल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने गुन्हेगारांचा वावर वाढला आहे.
टीबी वॉर्डातील काही पडक्‍या इमारती गुन्हेगारांचा अड्डा बनल्या आहेत. येथे वर्षभरापूर्वी बालिकेवर अत्याचाराची घटना घडली होती. तर, एका युवकाचा मृतदेहही आणून टाकला होता. त्यामुळे टीबी वॉर्डातील पडक्‍या इमारती पाडण्याचा निर्णय मेडिकल प्रशासनाने घेतला. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
टीबी विभागातील क्षयरोग विभागाच्या महिला वॉर्डाच्या दुरुस्तीचे काम झाले. 52 लाख रुपये खर्च करून वॉर्ड तयार करण्यात आला. त्याच धर्तीवर या भागातील निवासी गाळ्यांची दुरुस्ती करावी. गाळ्यांमध्ये अवैधरीत्या राहत असलेल्या पोटभाडेकरूंना हुसकावून लावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या काळात येथील इमारतीचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु, शासनाकडून निधी न मिळाल्याने प्रस्ताव रखडला. अतिशय दुरवस्थेत असलेल्या टीबी वॉर्डासह याच परिसरातील निवासी गाळे कोसळून लोकांच्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास जबाबदारी मेडिकल प्रशासनावर राहणार असल्याची तक्रार सिव्हिल ह्युमन राइट प्रोटेक्‍शन असोसिएशनने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com