कोई भी मुजरीम मॉ की कौंख से पैदा नही होता

भगवान वानखेडे 
Saturday, 21 December 2019

आर्थिक लाभापोटी तरूण वळतायेत गुन्हेगारीकडे वळत असून, कुटुंब व्यवस्थेवरही प्रश्‍नचिन्ह यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

अकोला : ‘कोई भी मुजरीम मां की कौंख से पैदा नही होता’ जुन्या हिंदी चित्रपटातील हा संवाद तुम्ही आम्ही ऐकला असेल. अगदी याच संवादाला अधोरेखीत करणारे चित्र अकोला शहरात घडत आहे. घरची प्रतिकूल परिस्थिती आणि अशिक्षीतपणामुळे बहुतांश तरूण गुन्हेगारीच्या डोहात उड्या मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही बाब अकोलेकरांसाठी चिंतनासह चिंतेची ठरत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय अल्पवयीन पीडितेस बाहेर राज्यात विकण्याऱ्या टोळीस सहाय्य करणाऱ्या मनिषा उर्फ तब्बू विष्णू तायडे नामक आरोपी महिलेस खदान पोलिसांनी अटक केली होती. तब्बूच्या माहितीवरून विकलेली अल्पवयीन पीडितेला शोधण्यात खदान पोलिसांना यशही आले आहे. मात्र, मुलीला विकण्यासारखा गुन्हा करण्याइतपत मानसिकता जाऊन पोहचल्यानंतर यामागील कारणांचा पोलिसांनी शोध घेतला असता निव्वळ पैशाच्या लालसेपोटी आणि अशिक्षीतपणामुळे झोपडपट्टी परिसरातील नागरिक गुन्हेगारी वळत असल्याचे दिसून आले. ज्या अल्पवयी पीडितेस विकल्या गेली तिचे शिक्षण जेमतेम आणि ज्या तब्बूने हे कृत्य केले तिला भेडसावणाऱ्या आर्थिक विवंचना यामुळे हा प्रकार समोर आल्याचे दिसून आले.

हेही वाचा - चाकूने वार अन्‌ दगडाने ठेचून दोघांची हत्या

 

Image may contain: one or more people

विस्कटलेली कुटुंब व्यवस्था
विकलेल्या अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबामधील वातावरण अशिक्षीत असून, पीडितेची आई आणि वडील दोघेही विभक्त राहतात. परिसरातील मुलांची वा मोठ्यांची वाईट संगतीचे अनुकरण केल्यानंतर बालवयातच शोलेशन, व्हाईटनरच्या नशेच्या आहारी गेलेली पीडितेला चक्क रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या तब्बूने हेरून विकल्याचे समोर आले होते. एकूणच कुटुंब व्यवस्था सुस्थितीत असती तर पीडितेवर योग्य ते संस्कार झाले असते ऐवढे मात्र खरे.

हेही वाचा- गुंगीचे बिस्कीट देऊन प्रवाशास लुटले!

No photo description available.

पैशाची लालसपेटी घडतो गुन्हा
शहरातील झोपडपट्टी परिसरात बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. विभक्‍त कुटुंब आणि आई-वडिलांना असलेले दारू-अमली पदार्थांचे व्यसन यांचा परिणाम मुलांवर होतो. संस्कारांचा अभाव आणि वाईट संगतीमुळे अनेक मुले वाममार्गाला लागत आहेत. काही केवळ शौक म्हणून चोरी, घरफोडी तसेच दुचाकी चोरण्यासारखे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. व्यसनाची पूर्तता करण्यासाठी किंवा मोबाईल, कपडे, घड्याळ, बाइक किंवा अन्य चैनीच्या वस्तू मिळविण्यासाठी मुले चोरी करण्यास धजावतात.

कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांततेच्या मार्गाने मार्गक्रम करून संतुलन ढळू देऊ नये. सर्वांसाठी कायदा सारखा असून, गंभीर गुन्ह्यापासून दुर राहणे हे सजग अाणि संस्कृत समाजाचे लक्षण आहे. विशेष म्हणजे पालकांनी पाल्यांकडे लक्ष देऊन अशा गुन्ह्यापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
-उत्तम जाधव, पोलिस निरीक्षक,खदान. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illetrate and poorety its making criminel