तोतया पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा

file photo
file photo

नागपूर : गुन्हे अन्वेशन विभागात (सीआयडी) पोलिस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करून तरुणीची 10 लाखांनी फसवणूक करणारा तोतया यश सुरेश पाटील (रा. एमजीनगर, विरार, मुंबई) याच्यावर हुडकेश्‍वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2018 ते 26 जून 2019 पर्यंत ही फसवणूक करण्यात आली. न्यू म्हाळगीनगर येथे राहणारी ऋचा वाणी (27) ही उच्चशिक्षित तरुणी आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रोमोनी या विवाह संकेतस्थळावर तिची यशसोबत ओळख झाली. यशने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने तिला "मी सीआयडी विभागात पोलिस उपनिरीक्षक आहे', असे सांगून सध्या नेमणूक बांद्रा येथे असल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर तो नागपूरला तरुणीच्या घरी आला. त्यावेळी त्याने तिच्या नातेवाइकांना ऋचासोबत लग्न करण्यास होकार दिला होता. त्यामुळे यशवर वाणी कुटुंबीयांचा विश्‍वास बसला.
दरम्यान, त्याने ऋचाचा भाऊ आणि मित्रांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी पैसे लागतील, असेही बोलला. त्यानंतर त्याने ऋचाच्या फेडरल बॅंकेच्या खात्यातून आपल्या खात्यात दहा लाख वळते केले. काही दिवसांपूर्वी ऋचाने त्याच्याशी संपर्क साधला असता मोबाईल क्रमांक बंद येत होता. त्याचप्रमाणे तो कॉल घेण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे ऋचाच्या कुटुंबीयांनी मुंबईला जाऊन चौकशी केली असता, यश तोतया पोलिस उपनिरीक्षक असल्याचे लक्षात आले. ऋचाच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी यशवर गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com