मेळघाट ऍक्‍शन प्लॅन राबवून बालमृत्यूचे प्रमाण रोखणार

अमरावती ः अधिकाऱ्यांना सूचना करताना आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे.
अमरावती ः अधिकाऱ्यांना सूचना करताना आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे.

अमरावती : मेळघाटातील दुर्गम भागातील आरोग्ययंत्रणेपर्यंत पोहोचण्यास रस्ते, संपर्कयंत्रणा आणि वीज साहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधा उपलब्ध करून कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व विभागांची मदत घेण्यात येईल. यासाठी मेळघाट ऍक्‍शन प्लान राबवून मृत्यूचे प्रमाण रोखण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मेळघाट परिसराचा दौरा आटोपून शनिवारी (ता. 23) येथील विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. शिंदे यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. या वेळी खासदार आनंदराव अडसूळ, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. अर्चना पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मेळघाटात आरोग्ययंत्रणा पोहोचली आहे. मात्र, पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. संपर्क होत नसल्याने कमी अंतरावरील रुग्णांनादेखील आरोग्य सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. यावर मोबाईल किंवा वायरलेस यंत्रणा उभारण्याबाबत विचार व्हावा. दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा मिळावी, यासाठी ग्रामीण रुग्णालयस्तरावर शिबिरे घेण्यात येतील. मेळघाटात आवश्‍यक तेवढ्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महिला आणि बालकांना कुपोषणापासून रोखण्यासाठी पूरक आहार देण्यात यावा. या भागातील नागरिकांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी डोस देण्यात यावे. दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी नेब्यूलायझर, वॉर्मर आदींचे वाटप करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com