esakal | युएस डॉलरचे आमीष देवून लाखो लुबाडले

बोलून बातमी शोधा

युएस डॉलरचे आमीष देवून लाखो लुबाडले
युएस डॉलरचे आमीष देवून लाखो लुबाडले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एका मृत पावलेल्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा असलेले हजारो डॉलर तुमच्या खात्यात वळते करतो, असे आमीष दाखवून तोतयाने अचलपूर येथील महिलेकडून 1 लाख 34 हजारांची रोख रक्कम लुबाडली.

अचलपूर पोलिसांनी याप्रकरणी गुरुवारी (ता. 22) रात्री अनोळखी व्यक्तीविरुद्ध फवणूकीचा गुन्हा दाखल केला. सदर महिलेची ओळख फेसबुकवरुन अनोळखी व्यक्तीसोबत झाली. त्या व्यक्तीने सदर महिलेचा व्हॉट्‌सऍप क्रमांक प्राप्त केला. नंबर प्राप्त करणाऱ्याने तो क्रमांक त्याच्या संपर्कातील दुसऱ्याला दिला. त्या नंबरवरुन चॅटिंग सुरू केली. चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीने लंडन येथील एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

त्याच्या खात्यामध्ये वारसा हक्काने हजारो यु.एस. डॉलर जमा आहे. ती रक्कम तुमच्या बॅंक खात्यामध्ये वळती करतो. असे आमीष दाखविले. त्यानंतर विविध कारणे सांगून अचलपूरच्या या महिलेकडूनच सोशल मिडीयावरुन ओळख झालेल्या व्यक्तीने एक लाख 34 हजार रुपयांची रक्कम लुबाडली. पैसे देवूनही डॉलर खात्यात जमा का झाले नाही, अशी विचारणा महिलेने केली असता तोतयाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरवात केली.

सदर महिलेने फसवणूक झाल्याची तक्रार अचलपूर ठाण्यात नोंदविली, त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संपादन - विवेक मेतकर