अपुऱ्या पोलिस संख्येतही 72 गावात जनजागृती

borgav police.jpg
borgav police.jpg

बोरगाव मंजू (जि. अकोला) : स्थानिक पोलिस स्टेशनला पोलिस कर्मचाऱ्यांच्या संख्येचे बळ जरी अपुरे असेल तरी, मात्र बोरगाव मंजू पोलिस कोरोनाला हरविण्यासाठी दिवस-रात्र एक करून 72 गावात ‘घरात रहाल तर सुरक्षित रहाल’ हा संदेश जनजागृतीच्या माध्यमातून घरात घरात पोहचवीत असल्याने नागरिक त्याला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे.

72 गावांचा आहे समावेश
बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हे अकोल्यापासून 18 किलोमीटर अंतरावर येत असून, पोलिस स्टेशनची हद्द जवळपास 35 किलोमीटर अंतराच्या व्यापकतेमधून 72 गावात जोडली गेली असून, सहा ‘बिट’ मध्ये ही गावे वसलेली आहेत. त्यामध्ये आपातापा, कुरणखेड, कानशिवणी, पळसो, दहीगाव, बोरगाव टाऊनचा समावेश येतो. त्यामध्ये बोरगाव शहरातच जवळपास 30 हजार लोकसंख्या येत असून मुबंई ते कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग येतून निघतो. येथे आठ ते 12 दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिक बाहेर निघतात. त्यामुळे काही प्रमाणात गर्दी वाढते. यासाठी पोलिस स्टेशनला सध्या स्थितीत नेहमी प्रमाणे एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि 47 पोलिस कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये सुद्धा 14 पोलिस कर्मचारी पोलिस स्टेशन मधील कार्यालयीन कार्यात व्यस्त असतात.

‘गाव सुरक्षित तर तुम्ही सुरक्षित’
लॉकडाउन आणि संचारबंदी लागू झाली तेव्हा पासून पोलिसांच्या कार्यात जनजागृती करण्याची भर पडली. त्यामुळे कामाचा ताण वाढला. यावर मात करण्यासाठी ठाणेदार हरिश गवळी यांनी पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसुरक्षा दल यांना गावातील जबाबदार व्यक्ती लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या समनवय्यातून ‘गाव सुरक्षित तर तुम्ही सुरक्षित’, सोशल डिस्टन्सिंग हेच सुरक्षित अंतर, या संकल्पनेतून चर्चा करून प्रत्येक गावात टप्याटप्याने बिटजमादार यांच्या वतिने पोलिस व्हॅनला लाऊडस्पीकर लावून जनजागृती करण्यात येत आहे. पोलिस संख्या जरी अपुरी असली तरी सकारात्मक नियोजन केले तर जनतेचे सहकार्य लाभते हे बोरगाव पोलिसांनी दाखवून दिले आहे.

नागरिक देत आहेत प्रतिसाद
कोरोनाला आपल्या गावापासून दूर ठेवायचे असेल तर घरात रहा. सुरक्षित रहा. हाच पोलिसांनी दिलेला संदेश पूर्ण गावात नागरिक जनजागृती म्हणून आत्मसात करून प्रतिसाद देत आहेत.
-सतीश फाले, ग्रा.पं.सदस्य, मासा सीसा उदेगाव

विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई
95 टक्के नागरिक पोलिस स्टेशन हद्दीत शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत आहेत. त्यामुळे अपुऱ्या पोलिसांची कमी भासत नाही. केवळ 5 टक्के लोक अनावश्‍यकपणे बाहेत फिरत आहे. त्यांच्यावर कारवाई करू.
-हरिश गवळी, ठाणेदार, बोरगाव मंजू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com