esakal | अन् बच्चू कडू गहिवरले; लक्ष्मीबाईला घास भरवून ‘शिवभोजनाचा’ शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

SHIVBHOJAN JILHA RUGNALAY (4).JPG

पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वोपचार रुग्णालयात गरजू रुग्णांसाठी सुरू झालेल्या शिव भोजनाचा उपाहारगृहांमध्ये जाऊन पाहणी केली.

अन् बच्चू कडू गहिवरले; लक्ष्मीबाईला घास भरवून ‘शिवभोजनाचा’ शुभारंभ

sakal_logo
By
शुभम बायस्कार

अकोला : शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे आक्रमक बच्चू कडू अनेकदा सामान्यांसाठी गहिवरल्याचे सुद्धा दिसून आले असाच काहीसा प्रसंग अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पाहायला मिळाला. 

रविवारी (ता.26) येथे शिवभोजन या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेच्या पहिल्या लाभार्थी लक्ष्मीबाई बोधाने (अकोला) या वृद्ध महिलेला घास भरून बच्चू कडून यांनी योजनेचा शुभारंभ केला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, पुरवठा अधिकारी काळे यांच्यासह अन्य उपस्थित.

महत्त्वाची बातमी - बच्चू कडू इन ॲक्शन, अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका

‘शिवभोजन’ जनसामान्यांसाठी फायदेशीर
पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वोपचार रुग्णालयात गरजू रुग्णांसाठी सुरू झालेल्या शिव भोजनाचा उपाहारगृहांमध्ये जाऊन पाहणी केली. दरम्यान, यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना जनसामान्यांसाठी फायदेशीर ठरेल. गरजू रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना या योजनेचा मोठा लाभ मिळेल. प्रशासनाने सर्वसामान्य लोकांना या योजनेचा कसा लाभ होईल यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी दरम्यान अधोरेखित केले.

हेही वाचा - #Republic day 2020 : तिरंग्याच्या खाली एकवटण्याची गरज : बच्चू कडू

गरिबांना सन्मानाने जेवन : आमदार बाजोरिया
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने ही योजना अस्तित्वात आली. गरिबांना सन्मानाने जेवन कसं मिळेल त्यासाठीचे नियोजन सरकारकडून करण्यात आल्याचे आमदार गोपिकीशन बाजोरिया यावेळी म्हणाले.