राज्यस्तरीय वनमहोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

चंद्रपूर : राज्यात ५० कोटी वृक्षलगवाडीचा संकल्प यंदा पूर्णत्वास जात आहे. यावर्षीचा ३३ कोटी वृक्ष लागवडीचा राज्यस्तरीय वनमहोत्सवाचा शुभारंभ चंद्रपुर जिल्ह्यातील आनंदवन या बाबा आमटे यांच्या सेवाधामात येथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.

आनंदवनाने जैवविविधता सांभाळली आहे. हा वारसा इतरांकडे गेला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करत नव्या प्रकारचे मियावाकी तंत्र आत्मसात करून महाराष्ट्राचा हिरवा टक्का वाढविणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून यंदाच्या सोहळ्याचा प्रारंभ झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंब्याचे तर वनमंत्री मुनगंटीवार यांनी वडाचे झाड लावून अभियानाची सुरुवात केली. वृक्षारोपणानंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, वनमंत्री मुनगंटीवार यांचा  संकल्प पूर्ण होत असल्याचे म्हटले. तत्पूर्वी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील समाधीला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देवून आदरांजली अर्पण केली. गेल्या दहा वर्षांत एखाद्या मुख्यमंत्र्यांनी आनंदवनात भेट देण्याची ही पहिली वेळ आहे, हे विशेष. याप्रसंगी डॉ. विकास आमटे, भारती आमटे यांची उपस्थिती होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of state tree plantation by CM Devendra Fadnavis