
दुसऱ्याने थोडे पुढे दुचाकी चालुस्थितीत उभी ठेवली होती. महिलेच्या मागे पायदळ जाणाऱ्या व्यक्तीने रितू यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे 25 ग्रॅमचे मंगळसूत्र जबरीने हिसकावले.
अमरावती ः चार दिवसात चेनस्नॅचिंगची तिसरी घटना घडली. पहिल्या दोन घटना या गाडगेनगर हद्दीत तर, रविवारी (ता. 29) राजापेठहद्दीत गानूवाडी परिसरात घडली.
रितू अनुप चौधरी (वय 27, रा. एमआर कॉलनी) या परिसरातील चिंतामणी लॉन येथे आयोजित लग्नसमारंभ आटोपल्यावर घराकडे परत जात असताना, दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या दुचाकीवर रितू यांच्या समोरुन आल्या. त्यानंतर दुचाकी मागे वळविली. दोघांपैकी मागे बसलेली व्यक्ती दुचाकीवरून खाली उतरून रितू चौधरी यांच्या पर्यंत चालत आले.
जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला
दुसऱ्याने थोडे पुढे दुचाकी चालुस्थितीत उभी ठेवली होती. महिलेच्या मागे पायदळ जाणाऱ्या व्यक्तीने रितू यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे 25 ग्रॅमचे मंगळसूत्र जबरीने हिसकावले. त्यानंतर समोर असलेल्या दुचाकीवर बसून, दोघेही फरार झाले. दोन्ही दुचाकीस्वारांनी आपला चेहऱ्यात काळ्या कपड्याने झाकला होता. रितू चौधरी यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पसार दुचाकीस्वारांविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला.
दोन ठिकाणचे फुजेट मिळतेजुळते
गाडगेनगरहद्दीत चेनस्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या, त्यापैकी एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व राजापेठच्या गानूवाडी येथील फुटेजमधील दोघांच्या हालचाली सारख्याच दिसतात.
अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव
गस्तीमध्ये होईल बदल
मुख्य चौकात पोलिसांच्या गस्तीची विशिष्ट वेळ ठरवून दिलेली आहे. आता त्यामध्ये अचानक केव्हाही बदल करून पोलिस तपासणी करतील. शिवाय पायदळ गस्त वाढविण्यावर विचार सुरू आहे. असे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांनी सांगितले.
संपादन - अथर्व महांकाळ