आवक घटली, भाव कडाडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

अमरावती ः गेल्या आठवड्यापासून राज्यभरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली आहे. त्याचा परिणाम स्थानिक भाजी बाजारावर जाणवला आहे. परजिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक थांबली आहे. श्रावण महिन्यात भाज्यांना अधिक मागणी असतानाच पुरवठा कमी झाल्याने भाज्यांचे दर घाऊक बाजारात 10 ते 15 व किरकोळ बाजारात 40 ते 80 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

येथील बाजार समितीच्या भाजी बाजारात दररोज होणारी आवक या सप्ताहात निम्म्यापेक्षाही अधिक संख्येने मंदावली. सोमवारपासून राज्यात पावसाने विविध जिल्ह्यात जोर धरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून भाजीपाल्याची आवक थांबली. नाशिक, धुळे या जिल्ह्यातून येणारा कांदा, टोमॅटोसह फ्लॉवर, गवार, वांगी, सिमला मिर्ची, पालक या भाज्या श्रावणांत ग्राहकांना दुप्पट दराने विकत घ्याव्या लागत आहेत. गेल्या चार दिवसांपासून भाजीपाल्याची आवक परजिल्ह्यातून आलेली नाही. स्थानिक पातळीवरही तालुक्‍यांमधून होणारा पुरवठा प्रभावित झाला आहे.
शुक्रवार ते रविवारी या तीन दिवसांत नाशिक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातून होत असलेला पुरवठा बंद झाला आहे. यासह इतर जिल्ह्यातही जोमदार पाऊस सुरू असल्याने भाज्यांची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनचालंकानी वाहतुकीची जोखीम स्वीकारलेली नाही. त्यामुळे आवक घटल्याने थोक व किरकोळ बाजारात भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. थोक बाजारात 10 ते 15, तर किरकोळ बाजारात 40 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे.
थोक बाजारात पालकाची आवक 8 क्विंटल असून 16 रुपये किलो भाव मिळाला. फूलकोबी 45, पत्ताकोबी व कारली 16, बरबटी 40, ढेमसे 35 व सिमला मिरची 28, भेंडी 18 व गवार 30 रुपये किलोने विकल्या गेली. सर्वात स्वस्त वांगी 12 व सांभार 12 रुपये किलो आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incoming decreased, prices Top