विदर्भात थंडीचा जोर वाढणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नागपूर - उत्तर भारतात हळूहळू गारठा वाढू लागल्याने विदर्भातही आता थंडीचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.

नागपूर - उत्तर भारतात हळूहळू गारठा वाढू लागल्याने विदर्भातही आता थंडीचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील गारठायुक्‍त वारे मध्य प्रदेशमार्गे विदर्भात येत असल्यामुळे काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. एक-दोन दिवस थंडीने किंचित दिलासा दिल्यानंतर पुन्हा पारा घसरू लागला आहे. मंगळवारी किमान तापमान पुन्हा 13 अंशांपर्यंत घसरले. येत्या काही दिवसांत पारा आणखी खाली घसरण्याची शक्‍यता आहे. उशिरा आगमन झालेल्या थंडीने गेल्या गुरुवारी नागपुरात या मोसमातील नीचांक (9.8 अंश सेल्सिअस) नोंदविला होता. सायंकाळपासून थंडी जाणवायला सुरुवात होते. मध्यरात्रीनंतर थंडीची तीव्रता अधिक असते. गारठ्यामुळे शहरात ऊनी कपड्यांची मागणी वाढली असून, स्वेटर्सच्या दुकानांवरही हळूहळू खरेदीदारांची गर्दी दिसू लागली आहे.

Web Title: Increase cold stress in vidarbha