सावधान..! तुमचा पासवर्ड गाडी, मोबाइलचा नंबर तर नाही ना...

अनिल कांबळे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अनेकदा फेसबूक युजर्स हे आपली स्वतःची माहिती अपलोड करतो. त्यामध्ये जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा नोंदवीत असतो. ही माहिती हॅकर्स शोधत असतात. त्यामुळे हॅकर्सच्या जाळ्यात आपण स्वतःहून अडकत असतो. 

नागपूर : सत्तेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजिटल इंडियाची घोषणा केली. तसेच सर्व व्यवहार डीजिटल करण्याचे आवाहन केले. याला भारतीयांनी उत्स्फूर्त असा प्रतिसादही दिला. यामुळेच की काय गुगल पे, पेटीएम, फोन पे, भीम आदींसारखे ऑनलाईन ऍप वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहेत. या ऍपद्वारे एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत, दुसऱ्यातून तिसऱ्या बॅंकेत सहज पैसे पाठवता येत असल्यामुळे बॅंकांमधील गर्दी कमी झाली आहे. यामुळे नागरिकांना होणार त्रासही कमी झाला आहे. 

हेही वाचा - अन अपहरण करून केला खून... वाचा

तसेच ऍपद्वारे सर्व प्रकारच्या बिलांचा भरणा करणे शक्‍य असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. या ऍपद्वारे पेट्रोल व वेळेची मोठी बचत होत आहे. विशेष म्हणजे कधीही, कुठेही आणि केव्हाही आपली कामे आटोपता येत असल्याने सर्व ऍपचा वापर करायला लागले आहे. अगदी पाच ते दहा रुपयांपासून लाखांवरील व्यवहार ऍपद्वारे शक्‍य झाले आहेत. पानटपरीवर नागरिक पाच ते दहा रुपये ऍपद्वारे देत असल्याचे आपल्याला दिसून येतात. हे ऍप जितके हाताळाला सोयीस्कर आणि सोपी आहे, तितकेच ते धोकादायक ठरू लागले आहेत. 

काय - नागपूरमध्ये होणार कर्जमाफीची घोषणा?

डीजिटल व्यवहार वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारीसुद्धा वाढत आहे. सायबर गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून, अनेकांना लाखोंनी गंडा घातल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. हॅकर्सच्या सहज जाळ्यात अडकण्यास ग्राहक स्वतः जबाबदार आहेत.

कारण, एटीएम किंवा ऍपचा पासवर्ड ठेवताना सहज लक्षात यावा म्हणून अनेक व्यक्‍ती जन्मतारीख, गाडीचा नंबर, मोबाईलचे शेवटचे चार अंक, जन्म वर्ष, लग्नाची तारीख किंवा लग्नाचा वाढदिवस, मुलाचे नाव असे ठेवतात. हॅकर्स हीच बाब हेरून फेसबूक, ट्विटरसारख्या ऍप्सच्या माध्यमातून हे सर्व ते जाणून घेतात. 

No photo description available.

अचानक खात्यातून पैसे काढल्याचा किंवा गंडा घातल्या गेल्याचा मोबाईलवर मॅसेज धडकतात. तेव्हा खाडकन डोळे उघडतात. मात्र, केवळ सोशल मीडियावर केलेल्या आततायीपणामुळे हॅकर्स आपली शिकार करीत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. सायबर हॅकर्स हे अनेकांचे बॅंक डिटेल्स घेऊन त्यांचे पासवर्ड हॅक करण्याचा अहोरात्र प्रयत्न करीत असतात.

उघडून बघाच - बलात्काराचा विरोध केल्यामुळेच युवतीचा खून

हॅकर्स अनेकांचे पासवर्ड "क्रॅक' करण्यात यशस्वीही ठरतात. अचानक मोबाईलवर पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज आल्यानंतरच बॅंक ग्राहकांना जाग येते. आपण कुणालाही पासवर्ड दिला नाही, या मतावर ते ठाम असतात. तरीही खात्यातून पैसे गायब झाल्यामुळे ते चक्रावतात. परंतु, सायबर हॅकर्सने केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणच हॅकर्सचे बळी पडल्याचे उघडकीस येते. 

No photo description available.

फेसबूक-ट्विटरवरून घेतात माहिती

अनेकदा फेसबूक युजर्स हे आपली स्वतःची माहिती अपलोड करतो. त्यामध्ये जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा नोंदवीत असतो. जवळपास 60 टक्‍के नेट बॅंकिंग करणारे किंवा एटीएम, डेबीड कार्ड वापरणारे सोपा पासवर्ड ठेवतात. त्यामध्ये सर्वाधिक वाहनचा क्रमांक, मोबाईलचे शेवटचे चार क्रमांक किंवा जन्मतारखेचा समावेश असतो. ही सर्व माहिती आपण स्वतःहून फेसबूक किंवा ट्विटरवर अपलोड करतो. त्यामुळे हॅकर्सच्या जाळ्यात स्वतःहून अडकत असतो. 

Image may contain: people sitting

स्वतःहून घ्या खबरदारी 
सोशल मीडियावर खासगी माहिती टाकू नये. फेसबूकवर प्रायव्हसी सेटिंग करून घ्यावी. सोपे पासवर्ड टाकू नये. ते पासवर्ड सहज हॅक होऊ शकतात. त्यामुळे स्वतःहून खबरदारी घ्यावी. हॅकर्सने पीन हॅक करून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्यास लगेच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी, तसेच बॅंकेलाही अर्ज करून माहिती द्यावी. जेणेकरून सायबर गुन्हेगारापर्यंत पोलिस पोहोचतील आणि पैसेही परत मिळू शकतील. 
- डॉ. अर्जुन माने, 
सहायक प्राध्यापक, शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था, नागपूर.

भयंकर - तुम्ही पिस्ता समजून शेंगदाना तर खात नाही ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in cyber crime due to digital transactions