एमबीबीएसच्या जागा वाढवून द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

हिवाळी अधिवेशनात आमदार सावरकर यांनी एमबीबीएसच्या जागा वाढविण्याबाबत लक्षवेधी मांडली. आमदार सावरकर यांच्या लक्षवेधीचे समर्थन माजी मंत्री डॉ. संजय कुटे, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार राम कदम, आमदार प्रशांत बंब, आमदार श्वेता महाले यांनी केले आहे.

अकोला : सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या व खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांसाठी शुल्क प्रतिपूर्ती व एम.बी.बी.एस पदवीच्या कमी झालेल्या जागा पूर्ववत वाढवून देण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

राज्य शासनाने सन 2019-20 या वर्षापासून शिक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या तसेच खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांसाठी अनुक्रमे 12 व 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. या आरक्षणामुळे आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमातील खुल्या प्रवर्गातील पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागा कमी झाल्या आहेत. एम.बी.बी.एस पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या 1134 जागा कमी होऊन 875 इतक्या राहिलेल्या. या जागा कमी झाल्यामुळे परिणामी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भरमसाठ शैक्षणिक शुल्क असणाऱ्या खासगी आरोग्य महाविद्यालयात प्रवेश घेणे अपरिहार्य झाले आहे. खासगी आरोग्य महाविद्यालयात खुल्या प्रवर्गातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती करण्यास शासनाचे वैद्यकीय विभागाने 20 सप्टेंबर 2019 रोजी परिपत्रक जारी होऊन सुद्धा अंमलबजवणीस विलंब होत आहे. कमी झालेल्या जागा पूर्ववत वाढवून भविष्यात प्रवेश प्रक्रिया राबविण्यास पालक वर्गाची तसेच सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संस्थेची मागणी आहे. शासनाने याबाबत पालक व पाल्यांना न्याय द्यावा, अशी आग्रहाची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडून केली.

हेही वाचा - आरोग्याचा ताप आणि संतापही

Image may contain: 1 person

यांचे समर्थन
एमबीबीएसच्या जागा वाढविण्यासंदर्भातील या  लक्षवेधी सूचना लावण्यासाठी सचिव महाराष्ट्र विधानसभा यांना माहिती सादर करण्याचे निर्देशित दिले आहे. आमदार सावरकर यांच्या लक्षवेधीचे समर्थन माजी मंत्री डॉ. संजय कुटे, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार राम कदम, आमदार प्रशांत बंब, आमदार श्वेता महाले यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase MBBS seats