
वर्धा जिल्ह्यात नापिकी आणि ओल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आत्महत्येचे सुरू असलेले सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
Vidarbha News : कर्जबाजारी युवा शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
वायगाव (नि.) वर्धा - जिल्ह्यात नापिकी आणि ओल्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आत्महत्येचे सुरू असलेले सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. वायगांव (नि) येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२१) ला सायकाळी घडली. प्रवीण विठ्ठल नगराळे (वय ४१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
वायगांव (नि) येथील शेतकरी प्रवीण विठ्ठलराव नगराळे याच्याकडे दहा एकर शेती आहे. शेती कसण्यासाठी त्याने भारतीय स्टेड बैंक व खासगी सावकाराचे कर्ज होते. ओला दुष्काळीस्थिती आणि नापिकीने ते वैफल्यग्रस्त झाले होते. प्रवीण यांचे आई वडील वृद्ध असून, त्यांना अकरा वर्षांचा मुलगा - व चार वर्षांची मुलागा अशे दोन मुल आहे. प्रवीण नगराळे यांच्या आत्महत्येमुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे.
दरम्यान, प्रवीण यांच्या आत्महत्येची घटना समजताच कांग्रेसचे माज़ी जिल्हा परिषद सद्श्य चंद्रकांत ठक्कर यांनी तत्काळ घटना स्थली जाऊन नगराले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आहोत, धीर सोडू नका, असा दिलासाही यावेळी त्यांच्या कुटुंबीयाना देण्यात आला. प्रवीण नगराळे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मूले, तीन भाऊ आणि बहिन असा मोठा परिवार आहे. करता पुरुष गेल्या ने नगराळे परिवार हतबल झाली आहे शासनाने यावर त्वरित मदत करावी अशे वायगाव (नि.) येथिल ग्रामस्थ बोलत आहे.