अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : अपक्ष उमेदवार अ‌ॅड. सरनाईकांची आघाडी कायम

Independent candidate Adv. Sarnaiks lead maintained
Independent candidate Adv. Sarnaiks lead maintained

अमरावती : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. यामध्ये पहिल्या फेरीच्या मोजणीमध्ये अपक्ष उमेदवार अ‌ॅड. किरण सरनाईक यांनी घेतलेली आघाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १९ राऊंडपर्यंत कायम होती. विजयी होण्यासाठी उमेदवाराला १४,९१६ मतांची गरज आहे. मात्र, अद्याप अर्धेही मत न मिळाल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबरला मतदान पार पडले. त्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती. गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिली फेरी पूर्ण झाली तेव्हा अपक्ष उमेदवार अ‌ॅड. किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे होते. शेखर भोयर हे तिसऱ्या स्थानी होते.

अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडी व भाजपला धक्का देत ६,५२८ मिळविली असली तरी विजयासाठी त्यांना एकूण १४,९१६ मते मिळवावी लागणार आहेत. विजयासाठी १४ हजार ९१६ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला. शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे ५,४४७ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर अपक्ष उमेदवार मनोहर भोयर हे ५२०५ मतांसह तिसऱ्या क्रमांकार विराजमान आहे. सुरुवातीपासून तिघेही याच क्रमांकावर कायम आहे.

तिसऱ्या पसंती क्रमांकावर मतमोजणी जाणार

पहिल्या दोन पसंती क्रमांकाची मतमोजणी पार पडल्यानंतरही विजयी उमेदवाराची घोषणा होऊ शकलेली नाही. विजयासाठी आवश्यक असलेल्या १४ हजार ९१६ मतांचा कोट्याजवळ कोणताही उमेदवार पोहोचू शकलेला नाही. अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडी व भाजपला धक्का देत ६,५२८ मिळविली असली तरी ते विजयापासून दूरच आहे. यामुळे तिसऱ्या पसंती क्रमांकावर मतमोजणी जाणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com