वेगळ्या विदर्भासाठी निवडणूक हेच आंदोलन

वामनराव चटप
वामनराव चटप

अकोला - वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे आघाडी सरकारनंतर युती सरकारनेही दुर्लक्ष केले. आश्‍वासन देऊन विदर्भात यश मिळविणाऱ्या भाजपलाही त्याचा विसर पडला. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भासाठी "निवडणूक हेच आंदोलन' असल्याचे जाहीर करून विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या नऊ संघटना आगमी लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी मंगळवारी अकोला येथे केली.

अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत चटप यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी 2 ते 12 जानेवारी 2019 या काळात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून "विदर्भ राज्य निर्माण यात्रा' काढणार असल्याची माहिती दिली. सध्या संसदेचे अधिवेश सुरू आहे. या अधिवेशनात किंवा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली.

भाजपकडून अवमान
भाजपने निवडणूक काळात वेगळ्या विदर्भ राज्याचे आश्‍वासन दिले. निवडून आल्यानंतर त्यांना या आश्‍वासनाचा इतर आश्‍वासनाप्रमाणेच विसर पडला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तर विदर्भ राज्य आमच्या "अजेंड्या'वरच नसल्याचे सांगून विदर्भातील जनतेचा अवमान केला असल्याची खंत चटप यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com