ये लगा सिक्‍सर...उपराजधानीत क्रिकेट फीव्हर

शिखरचा रिषभला कानमंत्र...
शिखरचा रिषभला कानमंत्र...

नागपूर : भारत आणि बांगलादेश दरम्यान उद्या रविवारी येथील जामठा स्टेडियमवर तिसरा टी २० सामना होणार असल्याने शहर पोलिसांतर्फे चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सामन्यादरम्यान जामठ्याकडे जाणारी जड वाहने अलीकडेच थांबविण्यात आल्याची माहिती अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित आणि विवेक मासाळ यांनी पत्रपरिषदेत दिली. 

स्टेडियममध्ये जाताना प्रत्येक प्रेक्षकाची दोन ठिकाणी तपासणी करण्यात येईल. प्रेक्षकांकडे काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्यास त्या काढून घेण्यात येतील. प्रेक्षकांना पाण्याच्या बाटल्या, झेंडे, फ्लेक्‍स, बॅनर्स आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात आली आहे. बंदोबस्तात 18 पोलिस निरीक्षक, 52 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, 399 पुरुष शिपाई आणि 81 महिला शिपाई यांना बंदोबस्तात नेमण्यात आले आहे. याशिवाय वाहतूक शाखेच्या 450 च्या वर कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. 

वाहने उचलून नेऊ 
सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किगमध्ये प्रेक्षकांनी आपली वाहने उभी करावीत. इतर कुठेही वाहने उभी केल्यास ती उचलून नेण्यात येतील. त्यासाठी विशेष क्रेन्स आणि टोइंग व्हॅनची व्यवस्था केली आहे, असेही डीसीपी पंडित यांनी पत्रकारांना सांगितले. 

सामानादरम्यान जड वाहने अडविणार 
सामना संपल्यानंतर प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असते. रस्त्यावर जड वाहतूक असल्याने अपघाताची शक्‍यता निर्माण होऊन वाहतूक कोंडी होऊ शकते. ही कोंडी टाळण्यासाठी सामना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जामठ्याकडे जाणारे ट्रक, ट्रेलर, टॅंकर यांना काही ठिकाणी अडविण्यात आले आहेत. हैदराबाद, चंद्रपूर आणि वर्ध्याकडून येणारी जड वाहने बुटीबोरी येथे, कामठी, भंडारा आउटर रिंग रोडने येणारी वाहने वेळाहरी टोल नाक्‍याजवळ, अमरावती रोडने येणारी वाहने मोहगाव झिल्पी फाट्याजवळ सामना संपेपर्यंत अडविण्यात येतील. 

अशी वळवली वाहतूक 
मानकापूर चौक, काटोल नाका, वाडी नाका, हिंगणा नाक्‍याकडून येणारी आणि छत्रपती चौकातून वर्धा रोडकडे येणारी वाहने दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहेत. ही वाहने छत्रपती चौकातून, श्रीनगर, शताब्दी चौक, मानेवाडा चौक, म्हाळगीनगर चौक, चामट चक्की उड्डाण पुलाखालून उजवे वळण घेऊन दिघोरी नाका, उमरेडकडे, बुटीबोरीमार्गे पुढे जातील. कामठी रोडने येणारी जड वाहने मारोती शोरूम, शीतला माता मंदिर, जुना पारडी नाका, प्रजापती चौक, चामट चौकातून डावीकडे दिघोरी नाका येथून उमरेडकडे आणि बुटीबोरीकडे जातील. भंडारा रोडने येणारी वाहने कापसी पुलाखालून डाव्या बाजूने वळून आउटर रिंग रोडवर जातील. प्रेरणा कॉलेजजवळून डावे वळण घेऊन पुढे उमरेड आणि बुटीबोरीकडे जातील असेही त्यांना पत्रकारांना सांगितले. सामना संपल्यानंतर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहनचालकांना दोन्ही बाजूकडील लेनवरून आपली वाहने नेता येतील असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com