भारत-बांगलादेश क्रिकेट संघ नागपुरात दाखल (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

दोन्ही संघ शनिवारी जामठा स्टेडियमवर सराव करणार आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत असल्यामुळे नागपूरच्या सामन्याला निर्णायक स्वरुप प्राप्त झाले आहे. जवळपास अडीच वर्षांनंतर नागपुरात टी-20 सामना होत असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

नागपूर : टी-20 क्रिकेट मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी यजमान भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांचे शुक्रवारी उपराजधानीत आगमन झाले. राजकोटचा सामना आटोपून दोन्ही संघ विशेष विमानाने दुपारी अडीच वाजता शहरात दाखल झाले. 

खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. विमानतळावरून दोन्ही संघ लक्‍झरी बसने आपापल्या हॉटेलकडे रवाना झाले. भारतीय संघाचा मुक्‍काम हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये, तर बांगलादेश संघ ली मेरीडियन हॉटेलमध्ये राहणार आहे. 

Image may contain: 5 people, people standing
के. एल. राहुल 

Image may contain: 4 people, people standing
शिखर धवन 

 

Image may contain: 8 people, people standing
टीमच्या अन्य सहकाऱ्यांसह कृणाल पांड्या 

Image may contain: 6 people, people standing
बांगलादेश क्रिकेट संघ

Image may contain: 4 people, people standing
बांगलादेश क्रिकेट संघ

नागपूरचा सामना निर्णायक 
दोन्ही संघ शनिवारी जामठा स्टेडियमवर सराव करणार आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत असल्यामुळे नागपूरच्या सामन्याला निर्णायक स्वरुप प्राप्त झाले आहे. जवळपास अडीच वर्षांनंतर नागपुरात टी-20 सामना होत असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ऑनलाइन तिकिटविक्रीला क्रिकेटप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने रविवारी स्टेडियम "हाऊसफुल्ल' राहण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian and bangladesh cricket team in nagpur