भारतीय संविधान येतेय ब्रेल लिपीत

केवल जीवनतारे
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नागपूर - समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित, वंचित, महिला, दिव्यांगासह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय संविधानात आहेत. त्या संविधानाची जागृती डोळस व्यक्तींना आहे. परंतु, अंधबांधव मराठीतील संविधानाच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. मात्र, आता डोळसांप्रमाणेच अंधबांधवांनाही संविधान वाचनाची आणि समजून घेण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संविधान ब्रेल लिपीत बार्टीच्या आर्थिक सहकार्यातून पाच खंडांत संविधान तयार होणार आहे. पहिला खंड प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

नागपूर - समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित, वंचित, महिला, दिव्यांगासह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय संविधानात आहेत. त्या संविधानाची जागृती डोळस व्यक्तींना आहे. परंतु, अंधबांधव मराठीतील संविधानाच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. मात्र, आता डोळसांप्रमाणेच अंधबांधवांनाही संविधान वाचनाची आणि समजून घेण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संविधान ब्रेल लिपीत बार्टीच्या आर्थिक सहकार्यातून पाच खंडांत संविधान तयार होणार आहे. पहिला खंड प्रकाशनाच्या वाटेवर आहे.  ब्रेल लिपीत संविधान आल्यामुळे अंध बांधवांनाही संविधानाबाबत डोळस होण्याची संधी मिळणार आहे.

ब्रेल लिपी ही अंध लोकांसाठी बनवली गेलेली लिहिण्याची व वाचण्याची एक पद्धत आहे. फ्रान्सच्या लुईस ब्रेल यांनी १८२१ साली ब्रेल लिपीची रचना केली. अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपीचा जनक हा ब्रेल हे अंध होते. व्यवसायाने ते शिक्षक होते.

सारे भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारापासून तर कर्तव्यप्रति जागरुक होत असताना अंधांच्या कानावर पडलेले संविधानाचे तेवढे महत्त्व त्यांना ठाऊक आहे. मात्र, राज्यातील नाशिक येथील दी बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड, मुंबईतील सावी फाउंडेशन आणि स्पर्शज्ञान या स्वयंसेवी संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून भारतीय संविधान ब्रेल लिपीत येत आहे.

संविधानदिनाच्या पर्वावर पुण्यात ब्रेल लिपीतील भारतीय संविधानाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन होणार आहे. या खंडात संविधानाच्या उद्देशिकेपासून तर मूलभूत कर्तव्य या प्रकरणांची माहिती ब्रेल लिपीत असणार आहे. यानंतर उर्वरित चार खंड प्रत्येक दोन महिन्यांच्या अंतराने प्रकाशित होणार असल्याची माहिती स्पर्शज्ञानचे ब्रेल मुद्रक स्वागत थोरात यांनी दिली. ब्रेल लिपीतील संविधानाच्या पहिल्या ६० पानांच्या खंडात इंडेक्‍स तसेच अनुछेदांची यादी असणार आहे. ब्रेल लिपीतील पाच खंडांच्या एकूण पानांची संख्या ८०० वर असेल.

दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संघटनेचे अध्यक्ष सतीश निकम यांच्या संकल्पनेतील हा प्रकल्प. सावी फाउंडेशनच्या पुढाकाराने ‘स्पर्शज्ञान’तर्फे ब्रेल लिपीत मुद्रित होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी)तर्फे आर्थिक सहकार्य मिळत आहे. या संयुक्त उपक्रमातून ब्रेल लिपीत भारतीय संविधान साकारले आहे. रविवारी पुण्यातील महात्मा गांधी सभागृहात अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांच्या हस्ते सकाळी अकराला प्रकाशित होईल. 
- रश्‍मी पांढरे, सावी फाउंडेशन, पुणे  

ब्रेल लिपीतील संविधान हाताच्या बोटांनी उठावटिंबांना स्पर्श करून अंध बांधव लेखन वाचन करू शकतील. या लिपीत उठावटिंब दबली जाऊ नये यामुळे संविधानाचे एक सलग खंड प्रकाशित केला नाही. वाचनास अडचण निर्माण होऊ नये यामुळे पाच खंडात ब्रेल लिपित संविधानाचे खंड तयार करण्यात आले आहेत. 
- स्वागत थोरात, स्पर्शज्ञान, मुंबई.

Web Title: The Indian Constitution is in Braille Lipi