मोठी बातमी : नितीन गडकरी बचावले; विमानात तांत्रिक बिघाड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

आज सकाळी इंडिगो एअरलाईन्सचे 6ई 636 हे विमान नागपूरहून दिल्लीला जाणार होते. या विमानातून नितीन गडकरींसह अन्य प्रवासी प्रवास करत होते. विमानाने टॅक्सीवे हून रन वे पर्यंतचा प्रवास केला. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने उड्डाण न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठा धोका टळला.

नागपूर : केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी आज (मंगळवार) थोडक्यात विमान अपघातातून बचावले. दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याने वैमानिकाने घेतलेल्या निर्णयामुळे अपघात टळला.

आज सकाळी इंडिगो एअरलाईन्सचे 6ई 636 हे विमान नागपूरहून दिल्लीला जाणार होते. या विमानातून नितीन गडकरींसह अन्य प्रवासी प्रवास करत होते. विमानाने टॅक्सीवे हून रन वे पर्यंतचा प्रवास केला. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने उड्डाण न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठा धोका टळला. अखेर विमान पुन्हा टॅक्सी वे वर आणण्यात आले. विमानातील बिघाडामुळे गडकरींचा दिल्ली दौरा टळला आहे.

एएनआयने याबाबतची माहिती देताना म्हटले आहे, की सर्व प्रवाशांना पुन्हा विमानातून उतरविण्यात आले आणि ही फेरी रद्द करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IndiGo flight Nagpur to Delhi is cancelled Nitin Gadkari was also on-board