इनडोअर गेमला ब्रेक कायम; सराव सुरू, स्पर्धेबाबत अनिश्‍चितता

file photo
file photo

अमरावती: मार्च महिन्यापासून मैदानावर खेडाळू सरावासाठी फिरकले नाहीत. नेहमी खेळाडूंच्या उपस्थितीमुळे गजबजलेल्या मैदानावर या काळात कमालीची शांतता होती. मैदानी सरावाला हिरवीझेंडी मिळाल्याने खेळाडूंना दिलासा मिळाला. परंतु स्पर्धेबाबतची अनिश्‍चितता कायम आहे. 
देशापातळीवर कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका खेळाडूंना सुद्धा बसला. सराव सुद्धा बंद पडला. त्यामुळे राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये आळस वाढला. चालू शैक्षणिक वर्षात खेळांची परिस्थिती कशी राहील, याबाबत अद्याप धोरण निश्‍चित नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन अभ्यासासोबत सरावाला नेमका किती वेळ द्यायचा, वेळ दिला तर, तो सत्कारणी लागेल काय? याबाबत खेळाडू, प्रशिक्षकांमध्ये संभ्रम आहे. खेळाडूंसोबत मैदानावर प्रशिक्षक येतील काय? याबाबत देखील अनिश्‍चितता आहे. सरावासाठी मैदानावरील संख्या वाढली तर, पुन्हा संसर्ग वाढणार नाही.

हे सुद्धा निश्‍चित नाही. त्यामुळे खेळाडूंना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक राहील. ऍथलेटिक्‍सचा सराव ५ ऑगस्टपासून सुरू करण्याची अनुमती मिळाली. परंतु इनडोअर गेम बाबत खेळाडूंमध्ये नैराश्‍याचीच भावना आहे. 

शालेय क्रीडा स्पर्धेबाबतचे धोरण शासन स्तरावरून निश्‍चित नाही. आणखी महिनाभर तरी सकारात्मक निर्णय होईल अशी परिस्थिती नाही. खेळाडूंना  मर्यादा सांभाळून मैदानी खेळांचा सराव करता येईल.
- गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती.

ऍथलेटिक्‍सच्या वैयक्तिक प्रकारात प्रशिक्षक सुद्धा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी हजर राहू शकतो. वैयक्तिक प्रकारात वेगळी पद्धत वापरून टिप्स देतात येतात. त्यामुळे मर्यादा सांभाळून खेळाडूंनी सराव करायला हरकत नाही.
- प्रा. अतुल पाटील, संयुक्त सचिव महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स संघटना.

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी घरीच आहेत. भविष्यातील त्यांची वाटचाल, खेळाडू म्हणून शारीरिक क्षमता चांगली राहावी याकरिता त्यांनी मैदानावर सराव करायला हरकत नाही. त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
- चेतक शेंडे, ऍथलेटिक प्रशिक्षक, अमरावती.

शासकीय विभागाने पुढाकार घ्यावा
यावर्षी स्पर्धा नाही झाल्या तरी, पुढे निश्‍चित होतील.  विद्यापीठ, पोलिस, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मालकीचे जे ट्रॅक आहेत ते बंद होते. आता खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करता, सरावासाठी निर्धारित वेळेसाठी उपलब्ध करून द्यावी. असे मत खेळाडूंनी व्यक्त केले.
 

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com