उद्योगांचा वीजपुरवठा महिन्यातून एकदाच बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

देखभाल दुरुस्तीसाठी उद्योगांचा वीजपुरवठा महिन्यातून एकदाच बंद केला जाईल. त्यासाठीचे नियोजन व प्रत्यक्ष कामासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्त केला जाईल, अशी ग्वाही महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिली. 

नागपूर - देखभाल दुरुस्तीसाठी उद्योगांचा वीजपुरवठा महिन्यातून एकदाच बंद केला जाईल. त्यासाठीचे नियोजन व प्रत्यक्ष कामासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्त केला जाईल, अशी ग्वाही महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिली. 

संजीव कुमार यांनी मंगळवारी औद्योगिक ग्राहकांसोबत प्रकाशगड मुख्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. यावेळी संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे आणि कोकण औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असले तरी मोबाईल व्हॅन, मीटर्स, फिडर सेपरेशन करणे, पायाभूत सुविधांची उभारणी आदी राज्यव्यापी विषयांवर चर्चा झाली. 

संजीव कुमार यांनी औद्योगिक ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यावर महावितणचा भर असून, त्यात आणखी सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगितले. औद्योगिक ग्राहकांसाठी राज्यभरात मीटरचा पुरवठा मुबलक केला असून, नवीन औद्योगिक ग्राहकांनी वीजजोडणीचा अर्ज ऑनलाइनच करण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्योगांच्या समस्यांच्या निवारणासाठी त्वरित उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी सर्वसंबंधितांना केली.

Web Title: Industrial power supply off once a month

टॅग्स