सोयाबीन पिकावर अळयांचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पारशिवनी (जि.नागपूर) : आधीच सोयाबीनचा पेरा या भागात कमी असून पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून सोयाबीनची पेरणी केली. त्यावरही अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट झाल्यास शेतकरी पुरता उद्‌ध्वस्त होऊ शकतो. सोयाबीनवर आता अळ्या दिसत आहेत. सोयाबीनच्या झाडांची पाने अळ्या खात असल्यामुळे सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. या अळ्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी दिसून येतात.

पारशिवनी (जि.नागपूर) : आधीच सोयाबीनचा पेरा या भागात कमी असून पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून सोयाबीनची पेरणी केली. त्यावरही अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट झाल्यास शेतकरी पुरता उद्‌ध्वस्त होऊ शकतो. सोयाबीनवर आता अळ्या दिसत आहेत. सोयाबीनच्या झाडांची पाने अळ्या खात असल्यामुळे सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. या अळ्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी दिसून येतात. पारशिवनी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत असल्याची तक्रार प्राप्त होताच शेतात पाहणी केली. काही प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. पण, त्याला घाबरण्याचे कारण नसून जेथे या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला त्या सोयाबीन पिकावर प्रोफेलोफाकस 50टक्‍के प्रवाही 20 मिलि व टृमझोफॉस 40टक्‍के प्रवाही 12.50 मिलि 10 लिटर पाण्यात मिळवून सोयाबीन पिकावर फवारणी केल्यास या अळीचा नायनाट करता येतो. जेथे या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच बांधावर कृषी अधिकारी वेळोवेळी यानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
जी.बी.वाघ
तालुका प्रभारी कृषी अधिकारी
पारशिवनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infection of alloys on soybean crop