भक्तात देव पाहणारे गजानन महाराज मंदिर संस्थान 

shegaon
shegaon

शेगाव : ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष करीत लाखो भाविक देश विदेशातून संत नगरी शेगावमध्ये येतात. ‘श्री’चे दर्शन घेवून तृप्त होतात. हे साध्य झाले ते केवळ येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तात देव पाहणारे संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कल्पक नियोजनामुळे. हे केवळ धार्मिक संस्थान नव्हे तर आदर्श व सुंदर व्यवस्थापनाचे विद्यापीठ असल्याची भावना येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

राज्य व देशात उत्पन्नाच्या बाबतीत श्रीमंत असणाऱ्या मंदिरांच्या गर्दीत मनाने श्रीमंत असणारे शेगावचे एकमेव संस्थान आहे. संत गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त दर्शनाव्यतिरिक्त व्यवस्थापनाचे धडे गिरविण्यासाठी मोठमोठ्या संस्थांचे विद्यार्थी येथे येत असतात. श्री संस्थानचे आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य, श्री गजानन महाराजांनी जोपासलेला आध्यात्म मार्ग नजरेसमोर ठेऊन सुरू आहे. संस्थानद्वारा वारकरी शिक्षण संस्थेसारख्या अद्वितीय अभ्यासक्रमातून ‘उद्याचा वारकरी‘ घडविला जात आहे. 

वारकरी शिक्षण संस्था
वारकरी शिक्षण संस्था सन 1967 मध्ये मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते स्थापन झाली. संत वाङमयातील तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जनमानसांमध्ये भागवत भक्तीची, निति धर्माची ज्ञानज्योत तेवत राहून समाज व्यसनमुक्त व्हावा व राहावा, पारमार्थिक संस्कार घडून संस्थेत शिक्षण घेतलेल्या प्रवचनकार, कीर्तनकार त्यांनी याच माध्यमातून लोकांचे आत्मकल्याण साधावे याच सद्उद्देशाने वारकरी शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. 

संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास, भोजन, गणवेश, ग्रंथ, स्टेशनरी आदी व्यवस्था संस्थेमार्फत सेवार्थ केली जाते. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता एकूण 10 अध्यापक सेवक असून, त्यांनी संप्रदायाच्या नियमानुसार विविध क्षेत्री ज्ञानार्जन करून पदविका प्राप्त केली आहे. वारकरी संस्थेतील विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून 2 (सहामाही, वार्षिक) परीक्षा संपन्न होतात. सेवाकार्यामध्ये कार्यरत असणारा सेवक वर्ग हा सेवेला आपला जीवनधर्म मानूनच कार्य करतो. 

17 हजार सेवाधारी 
17 हजार ‘श्रीं’चे सेवाधारी संस्थानमध्ये भक्तांची सेवा करून व ‘श्रीं’च्या चरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी येतात. कर्मयोगी शिवशंकरभाऊच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे संस्थानचा कारभार शंभर टक्के पारदर्शक असा आहे. स्वत: भाऊ किंवा कोणीही ट्रस्टी संस्थानमधील पाणीही पित नाहीत. जेवणाचा डबा घरून आणतात. एकही पैसा मानधन न घेता ते काम करतात. त्यात आबालवृद्ध, गावखेड्यातील मुलामाणसांपासून नोकरदार, बड्या कंपन्यांमधील अधिकारीही असतात. हजारो सेवेकरी सेवेची संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

मोबदला मिळतोय म्हणून सेवा नाही 
‘पैशाबरोबर अधिकार येतो, कर्तव्याचा मात्र विसर, सेवेत कर्तव्याचे पालन होवून उत्कर्ष होतो, याचा अर्थ या सेवेकऱ्यांकडून उमजतो. ‘चांगल्या, निरपेक्ष वृत्तीनं, सेवाभावानं देखील या जगात वावरता येतं हेच त्यांना सुचवायचे आहे. श्रींचे सेवाधारी मोठ्या सेवाभावाने कार्य करतात. या व्यतिरिक्त प्रतीक्षा यादीवर श्रींच्या सेवेसाठी जवळ-जवळ पाच हजार सेवाधाऱ्यांनी सेवा मिळावी म्हणून अर्ज केलेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com