माहिती आयुक्तपदी सरकुंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

अमरावती - राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठातील माहिती आयुक्त म्हणून संभाजी सरकुंडे यांनी पदभार स्वीकारला. 

सरकुंडे यांची नुकतीच माहिती आयुक्त म्हणून पदावर नियुक्ती झाली. मुंबई राज्य माहिती  आयुक्त कार्यालयात त्यांचा शपथविधी नुकताच पार पडला. यापूर्वी या पदाचा अतिरिक्त कार्यभार माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांच्याकडे होता. राज्यपालांच्या आदेशान्वये सहा जानेवारीला सरकुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. 

नवीन माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांचा जन्म १० मे १९५६ ला झाला. त्यांनी कला व विधी शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९८२ मध्ये उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्त झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केले. 

१९९६ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नतीने नियुक्त झाल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाणा, जिल्हाधिकारी भंडारा, अतिरिक्त विभागीय आयुक्त अमरावती व नागपूर या पदावर काम केले. आदिवासी विकास आयुक्त म्हणून नाशिक येथे व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे आयुक्त म्हणून काम केले.

Web Title: Information Commissioner sarakunde