ग्रामीण पोलिसांचा माहितीपट राज्यस्तरावर; लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी जनजागृती

information film of rural police at state level
information film of rural police at state level

अमरावती : लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांसंदर्भात अमरावती ग्रामीण पोलिसांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या माहितीपट आता राज्यस्तरावर झळकण्याची शक्‍यता बळावली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी त्यासंदर्भात शुकवारी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.

या नावीन्यपूर्ण संकल्पनेसंदर्भात राज्याच्या पोलिस महासंचालकांनी पोलिस अधीक्षकांकडून माहिती घेऊन उपक्रमाची स्तुती केली. शालेय शिक्षण मंत्र्यांसह पालकमंत्र्यांनासुद्धा या संदर्भात माहिती दिली गेली. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने ८ सप्टेंबर ते ३० ऑक्‍टोबर या काळात परतवाडा, अंजनगावसुर्जी, वरुड, दत्तापूर, दर्यापूर, तिवसा हद्दीत येणाऱ्या एकूण २३ शाळांमध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयावरील वेबीनारद्वारे माहिती पट दाखविण्यात आला.

या माहितीपटामध्ये बालकांना कायद्यासंदर्भातील ज्ञान देण्यात आले. त्यामध्ये एकूण वीस हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना हा माहितीपट दाखविण्यात आला. केवळ वेबीनारद्वारे माहितीपट दाखविण्यापर्यंत ही प्रक्रिया केली असे नव्हे तर त्यात दिलेली माहिती विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात स्वीकारली यासंदर्भात विद्यार्थ्यांचा पहिला पेपर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. माहितीपट दाखविल्यानंतर दुसरा पेपर घेतला. त्यावरून विद्यार्थ्यांना सदर विषयावरील माहिती किती समजली हे लक्षात आले.

२३ शाळांमध्ये निकाल लक्षात घेता व्हिडिओ पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांना या विषयासंदर्भात जर ५५ टक्के ज्ञान मिळाले असेल तर व्हिडिओ बघून त्यांच्या बुद्धीमत्तेचा स्तर ८५ टक्‍क्‍यापर्यंत गेल्याचे निदर्शनात आले. विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद सर्वोत्तम असल्याचे त्यावरून दिसले. शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कायद्याने ज्ञान व्हावे. जनजागृती करता यावी या दृष्टिकोनातून अंमली पदार्थ व मादक द्रव्य विषयावरील शाळा व महाविद्यालीन विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली.

दारुबंदी अधिनियम, एनडीपीएस ॲक्‍टमधील तरतुदींचे बारकावे विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले. स्त्रीभ्रृणहत्या, हुंडाबळी, स्त्रियांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम आदी बाबी ऑनलाईन व्हिडिओद्वारे मनावर ठसा उमटविण्याऱ्या ठरतील, असे ते म्हणाले.  

सर्वांच्या फायद्याचा ठरेल
वेबीनार संदर्भातील व्हिडिओ बघून संबंधित शाळा, विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. समाजहितासाठी हा उपक्रम सर्वांच्या फायद्याचा ठरेल असा विश्‍वास वाटतो.
- डॉ. हरिबालाजी एन.,
पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com