आप सब मेरे लिए देवदूत हो..!

नागपूर - मेडिकलमध्ये उपचारानंतर बरा झालेला नीरज; सोबत मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते.
नागपूर - मेडिकलमध्ये उपचारानंतर बरा झालेला नीरज; सोबत मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते.

नागपूर - केवळ १८ वर्षांचा तरुण रक्ताने माखलेल्या अवस्थेत सोनेगावनजीकच्या रेल्वे लाइनजवळ निपचित पडून होता. खाकी वर्दीवाल्यांना खबर दिली. तत्काळ मेडिकलमध्ये भरती करण्यात आले.

कपड्यातून ओल्या जखमांमधून दिसत असलेल्या रक्ताने मानसिक आजाराच्या विळख्यात तो सापडला. सारेच बघ्याच्या भूमिकेत असताना मेडिकलमध्ये सामाजिक अधीक्षकपदावरील सारे कार्यकर्ते जखमी युवकाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. मेडिकलच्या अस्थिव्यंग विभागात १० दिवसांच्या उपचारानंतर बरा झाला. उपचारासोबतच अनोळखी रुग्णाच्या कुटुंबीयांचा शोध सामाजिक कार्यकर्ते आशीष वाळके यांनी सुरू केला. अखेर या सत्कर्माचा विजय झाला. पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांकडून ओळखही पटली. त्या युवकाला सुखरूप रेल्वेत बसवून दिले. आर्थिक मदतही केली. जेवणाचा डबाही दिला. थरथरत्या ओठांनी ‘आप सब मेरे लिए देवदूत हो..!’ असे म्हणत दोन्ही हात जोडून पस्तिशीतील तरुणाने निरोप घेतला. ही चित्रपटाची कथा नाही, तर मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक २ मधील वास्तव दर्शन आहे. नीरज रॉय असे या १८ वर्षीय तरुणाचे नाव असून तो कामाच्या शोधात बिहारवरून मुंबईला निघाला होता. नागपूर स्थानकावर रेल्वे पोचली. येथून मुंबईच्या दिशेने रेल्वे निघाली असता नजीक सोनेगावजवळ नीरज रेल्वेतून खाली पडला. रक्ताने लाल झाला. पायाला जखम झाली. नीरजच्या मनावर परिणाम झाला. त्याच अवस्थेत तो बडबड करीत होता. काय झाले, हे त्यालाही कळत नव्हते. सात दिवस त्याला काहीच समजले नाही. मात्र, हळूहळू भाषेवरून त्याच्याशी आशीष वाळके यांनी संवाद सुरू केला.

शरीरावरील जखमा भरू लागल्या. तुटक शब्दातून त्याने बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील उरबाडी असे सांगितले. वाळके यांनी पोलिसांना व्हॉट्‌सॲप वरून संवाद साधला. कुटुंबाशी संवाद साधला. दरम्यान, आर्थो विभागातील डॉ. सोनिया राठोड, डॉ. कौस्तुभ यांनी त्याची शुश्रूषा केली. रविवारी मेडिकलच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला निरोप दिला. ‘शहर में ही काम करुंगा’ असे सांगत नीरज रेल्वेने बिहारला रवाना झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com