बीडीओंच्या अंगावर फेकली शाही  

बीडीओंच्या अंगावर फेकली शाही  

तेल्हारा - घरकुल योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल नुकतेच अमरावती येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानित केलेल्या गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर शाही फेकण्याचा प्रकार बुधवारी (ता.१९) दुपारी घडला. पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराने अधिकारी कर्मचारी वर्ग संतप्त झाला असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी आरोपिंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गटविकास अधिकारी हे बुधवारी (ता.१९) कार्यालयामध्ये आले असता त्यांच्या दैनंदिन शासकिय कामकाज करीत होते. त्यावेळी काही वेळाने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते कक्षामध्ये काेणतीही पूर्वकल्पना देता निवेदन घेऊन आले. त्यांच्या निवेदनाबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचे ड सर्वेक्षण करून योग्य लाभार्थी सरंक्षणामध्ये समाविष्ट करण्याबाबत, अपंगांचा ५ टक्के निधी ग्रा.पं. स्तरावर खर्च करणेबाबत ग्रामीण भागातील रस्ते दूरूस्त करणेबाबत असे विविध विषय नमूद केले होते. सर्व विषयावर सविस्तर चर्चा व त्यांना योग्य तो न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंचायत समिती स्तरावरील सहायक गटविकास अधिकारी सरोदे, विस्तार अधिकारी ठोंबरे, ग्रामसेवक खुमकर, इंगळे, निलेश नाईकवाडे, प्रशांत पांडे, तोरखडे, तनविर शहा, ढोले, कडू, वानखडे, पोलिस स्टेशनचे चिंचोळकर तसेच इतर ७ ते ८ कर्मचारी उपस्थित होते. या चर्चेदरम्यान ग्रा.पं. अटकळी येथील दिलीप पाथ्रीकर व ईतर कार्यकर्ते यांनी घरकुलाबाबत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विचारणा करून अरेरावी केल्याचा आरोप बीडीओंनी तक्रारीत केला. तक्रारीत नमुद आहे की, अंगावर काळ्या रंगाची रासायनिक द्रव्ये फेकले व त्यामधील विकी मंगळे व प्रफुल्ल धबडगाव, शिवचरण कराळे यांनी माझ्या कक्षातील टेबलवर चढून मारहाण केली. संपूर्ण चेहऱ्यावर रासायनिक द्रव्ये पडून  संपूर्ण कपडे काळे झाले. डोेळ्यात द्रव्य गेल्याने डोळ्यालाही दुखापत झाली. कार्यकर्त्यांनी अरेरावी करून कार्यालयातील साहित्याची नासधूस केल्याचा आरोप सुद्धा केला आहे.

या प्रकारानंतर आरोपी पळून गेले. दरम्यान या घटनेमुळे पंचायत समितीच्या आवारात एकच खळबळ उडाली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यामधील आरोपींचा शोध सुरू असून पूढील तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com